जगज्जेत्या बुद्धीबळपटूला आव्हान देणारा खेळाडू निवडण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या कँडिडेटस स्पर्धेत भारताचा १७ वर्षीय ग्रँडमास्टर डी.गुकेश याने इतिहास रचला आहे. डी.गुकेशने ही स्पर्धा जिंकत सर्वांत लहान आव्हानवीर होण्याचा मान त्याने मिळवला आहे. आता विश्वविजेता बनण्यासाठी गुकेशचा सामना चीनच्या डिंग लिरेनशी होणार आहे.
सदर स्पर्धा सोमवारी कॅनडातील टोरंटो येथे खेळवली गेली. ही स्पर्धा जिंकणारा तो देशातील सर्वांत तरुण खेळाडू ठरला आहे. विश्वनाथन आनंद नंतर स्पर्धा जिंकणारा तो दुसरा भारतीय आहे. कँडिडेटस स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात अमेरिकेच्या हिकारु नाकामुरा आणि डी.गुकेश यांच्यात सामना झाला. हा सामना बरोबरीत सुटला. मात्र, सरस गुणसंख्येच्या जोरावर डी.गुकेशने या स्पर्धेचा विजेता होण्याचा मान पटकावला.
टूर्नामेंट जिंकण्याबरोबरच गुकेशने ८८,५०० युरो (अंदाजे ७८.५ लाख रुपये) चे रोख बक्षीसही जिंकले. उमेदवारांसाठी एकूण बक्षीस रक्कम ५ लाख युरो होती. ही प्रतिष्ठित स्पर्धा जिंकणारा ग्रेट विश्वनाथन आनंदनंतर गुकेश दुसरा भारतीय ठरला. पाच वेळा विश्वविजेता आनंदचा विजय २०१४ मध्ये आला होता.
गुकेशने १४व्या आणि अंतिम फेरीत अमेरिकेच्या हिकारू नाकामुरासोबत सहज ड्रॉ खेळला आणि १४ पैकी नऊ गुणांसह स्पर्धा पूर्ण केली. या विजयामुळे गुकेशला या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या सामन्यात सध्याचा विश्वविजेता चीनच्या डिंग लिरेनचे आव्हान असणार आहे. चेन्नईच्या या युवा बुद्धिबळपटूने कास्पारोव्हच्या विक्रमात बरीच सुधारणा केली.
विजयानंतर गुकेश म्हणाला की, ‘खूप आनंद झाला. मी फॅबियो कारुआना आणि इयान नेपोम्नियाच्ची यांच्या खेळाचे देखील अनुसरण करत होतो. त्यानंतर मी ग्रेगॉर्ज गजेव्स्की या दुसऱ्या खेळाडूशी बोललो, मला वाटते की त्याचा फायदा झाला.
विश्वनाथन आनंदने एक्सवर पोस्ट केले, ‘सर्वांत तरुण चॅलेंजर बनल्याबद्दल डी गुकेशचे अभिनंदन. वाका चेस कुटुंबाला तुम्ही जे काही साध्य केले त्याचा अभिमान वाटतो. तुम्ही ज्या प्रकारे खेळलात आणि कठीण प्रसंग हाताळलेत त्याबद्दल मला वैयक्तिकरित्या खूप अभिमान वाटतो. या क्षणाचा आनंद घ्या.’