Monday, June 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सिव्हिल पाच मयत गळफास दोन , एक्सीडेंट एक

तरुण भारतbyतरुण भारत
May 30, 2026
in crime
0
0
SHARES
19
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या नळदुर्गच्या दुचाकीस्वाराचा मृत्यू 


सोलापूर – अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या नळदुर्गच्या एका दुचाकी स्वाराचा    उपचारादरम्यान येथील शासकीय रुग्णालयात आज शुक्रवारी सकाळी दहा वाजता मृत्यू झाला.
     किशोर कोंडीबा बनसोडे ( वय 42 वर्ष , राहणार नळदुर्ग ) असे त्या मयत दुचाकी स्वाराचे  नाव असून तो 27 मे रोजी रात्री धाराशिव कडून नळदुर्ग कडे मोटरसायकल वरून डबल सीट निघाला असताना वाटेत बसवंती पाटी तुळजापूर रोडवर अज्ञात चार चाकी वाहनाने त्याला पाठीमागून धडक दिली .  या धडकेत मार लागून गंभीर जखमी झाल्याने त्याला दोन दवाखान्यात उपचार करून येथील शासकीय रुग्णालयात मेव्हणा कुणाल कांबळे यांनी आज शुक्रवारी पहाटे एक वाजता बेशुद्ध अवस्थेत दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान सकाळी दहा वाजता मृत्यू झाला.
 पाणी समजून थिनर पिलेल्या 9 वर्षाच्या मुलाचा अखेर मृत्यू
सोलापूर – पाणी समजून थिनर पिलेल्या एका नऊ वर्षाच्या मुलाचा उपचार दरम्यान येथील शासकीय रुग्णालयात आज शुक्रवारी सकाळी दहा वाजता मृत्यू झाला .
     आरव भैरवनाथ माने (वय 9 वर्ष , रा. अकोलीकाठी , उत्तर सोलापूर ) असे त्या मयत मुलाचे नाव आहे .  22 मे रोजी सायंकाळी पाच वाजता राहत्या घरासमोर खेळत असताना त्याने चुकून पाणी समजून थिनर पिले होते . त्याचा त्रास होऊ लागल्याने त्याला बीबीदारफळ येथील  एका खाजगी दवाखान्यात उपचार करून आजोबा नामदेव माने यांनी त्वरित येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याचा आज सकाळी मृत्यू झाला .
एमआयटी कॉलेज समोर डिव्हायडर ला धडकून दुचाकीस्वार जागीच ठार
सोलापूर – भरधाव  दुचाकी रस्त्याकडेच्या दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात बेळगावचा दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना केगाव येथील एमआयटी कॉलेज समोरील ब्रिज जवळ गुरुवारी दुपारी घडली .
    सर्वेश निजप्पा गुरव ( वय 42 वर्ष , रा. धमकण , मरडी , जी. बेळगाव ) असे त्या मयत दुचाकीस्वाराचे नाव असून तो गुरुवारी बेळगावहून संभाजीनगर कडे जाण्यासाठी दुचाकी वरून निघाला असताना दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास तो विजापूर पुणे बायपास रोड वरून केगाव एमआयटी कॉलेज जवळील ब्रिजवरून खाली उतरत असताना त्याची दुचाकी बाजूच्या डिव्हायडर ला धडकली . त्यात तो गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला . त्याला एका रुग्णवाहिकेतून सायंकाळी चार वाजता येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले .
शंकर नगरात तरुणाची छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या 
 
सोलापूर – अज्ञात कारणावरून एका 38 वर्षीय तरुणाने घरातील छताच्या पंख्याला लुंगीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना होडगी रोडवरील शंकर नगरात गुरुवारी दुपारी दोन वाजता उघडकीस आली .
     अमोघसिद्ध अशोक मोरे (वय 38 वर्ष , रा. 88 / बी, शंकर नगर होडगी रोड, सोलापूर )असे त्या मयत तरुणाचे नाव आहे . गुरुवारी दुपारच्या सुमारास त्याचा मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत घरच्यांना आढळून आला . ही खबर एमआयडीसी पोलिसांना समजली असता हवालदार एस एस कांबळे यांनी घटनास्थळी पोहचून सदरचा मृतदेह इतरांच्या साह्याने खाली उतरवून येथील शासकीय रुग्णालयात सायंकाळी पाच वाजता शवविच्छेदनासाठी दाखल केला.
बोरीच्या झाडाला गुळवेलच्यावेलीने गळफास घेऊन 26 वर्षाच्या तरुणीची आत्महत्या
सोलापूर – अज्ञात-करणावरून एका 26 वर्षाच्या तरुणीने बोरीच्या झाडाला गुळवेलच्यावेलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे शिवारातील एका शेतात गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता उघडकीस आली .
     अर्चना अनिल भाकरे (वय 26 वर्ष , रा . हनुमान नगर , भवानी पेठ सोलापूर ) असे त्या मयत तरुणीचे नाव आहे . गुरुवारी सकाळी उळे शिवारातील होनसळ जाणाऱ्या रस्त्या बाजूला असलेल्या निवृत्ती कोळी यांच्या शेतातील बोरीच्या झाडाला अर्चना भाकरे याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला .ही खबर गावचे पोलीस पाटील कुंभार यांनी सोलापूर तालुका पोलिसांना कळविली . पोलीस हवलदार एम ए भंडारी यांनी घटनास्थळी पोहचून गावकऱ्यांच्या मदतीने  वेली तोडून अर्चना भाकरे हिचा मृतदेह खाली उतरविला व पंचनामा करून मृतदेह यादीसह येथील शासकीय रुग्णालयात शव विच्छेदनासाठी  दुपारी साडेबारा वाजता दाखल केला .
Post Views: 59
Previous Post

एसकेएन सिंहगडच्या विद्यार्थिनीचे जागतिक स्तरावर दैदिप्यमान यश

Next Post

“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

ताज्या बातम्या

रंगभवन जवळचा छत्रपतींचा पूर्णाकृती पुतळा आता येता जाता दिसणार सोलापूरकराना #solapurnews #marathinews

June 7, 2026

अखेर देवस्थान अधिनियम निर्मूलन कायदा प्रारूपास सरकारने दिली स्थगिती #marathinews #maharashtranews

June 7, 2026

सोलापूरच्या मिलिंद थोबडेंची बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी हॅट्रिक #solapurnews #marathinews

June 7, 2026

गोवा हैद्राबाद विमानसेवा ऑगस्टपर्यंत बंद पण सप्टेंबर मध्ये नियमित सेवा #solapurnews

June 7, 2026

वा क्या बात है ……ड्रोनची मदत घेत पोलिसांनी मुळेगाव तांड्यातील अवैद्य दारू अडड्यांना केले उध्वस्त

June 7, 2026

सोलापूर जिल्हा सबज्युनिअर हँडबॉल संघ निवड चाचणी उद्या 

June 6, 2026

देवस्थान इनाम कायदा स्थगित केल्याबद्दल महसूलमंत्र्यांचे आभार!

June 6, 2026
अन्नछत्र हे स्वामींचे शक्तीपीठ असल्याचे मनोगत – उपसचिव सचिन सहस्रबुद्धे

अन्नछत्र हे स्वामींचे शक्तीपीठ असल्याचे मनोगत – उपसचिव सचिन सहस्रबुद्धे

June 6, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0898335

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697