जनार्धन कुलकर्णी यांचे निधन
परतूर : प्रतिनिधी
येथील रहिवाशी तालुक्यातील मूळ बाबुलतारा येथील
जनार्धन रेणूराव कुलकर्णी यांचे वयाच्या ७० व्या वर्षी दि ५ जुलै रोजी सकाळी साडेसहा वाजेचा सुमारास निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर परतूर येथील स्मशानभुमीत दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे.