मध्यप्रदेशातील इंदोर-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री उशिरा दोन वाहनांच्या धडकेत 8 जण घटनास्थळीच मृत्यूमुखी पडले तर एक जण जखमी झाल्याची माहिती आहे.
अपघाताबाबत मध्य प्रदेश पोलिसांनी सांगितले की, इंदूर-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घाटबिल्लाडजवळ एका अज्ञात वाहनाने जीपला धडक दिली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक रूपेश कुमार द्विवेदी यांनी सांगितले की, इंदूर अहमदाबाद रोडवरील बेटमाजवळ हा भीषण अपघात झाला. यामध्ये एमपी 43 बीडी 1005 क्रमांकाची कार रस्त्यावर उभ्या असलेल्या डंपरला धडकली. घटनास्थळी वाळू पसरलेली असल्याने डंपर वाळूने भरला असल्याची शंका आहे. या अपघातात कारमध्ये प्रवास करणाऱ्या 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.