Wednesday, May 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दोन पक्षांना संपवण्याच्या नादात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंनी यादी वाचली, काकांनाही उत्तर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
May 16, 2024
in maharashtra
0
दोन पक्षांना संपवण्याच्या नादात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंनी यादी वाचली, काकांनाही उत्तर
0
SHARES
99
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दोन पक्ष संपवायचे म्हणून तुम्ही आलात, पण या प्रयत्नात तुम्ही भाजपलाच संपवलं, अशा शब्दांत ठाकरेसेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. मी पुन्हा येईन म्हणालो होतो. थोडा उशिरा आलो. पण दोन पक्ष फोडून आलो, असं विधान फडणवीसांनी केलं होतं. त्या विधानावरुन आदित्य ठाकरेंनी फडणवीसांवर टीका केली.

 

मूळ भाजपचे अनेक नेते आज कुठेच दिसत नाहीत. भाजपचे प्रवक्ते म्हणून जे नेते समोर दिसत आहेत, ते कुठून ना कुठून आयात करण्यात आलेले आहेत. विधानसभेचे अध्यक्षही दोन पक्ष फिरुन भाजपमध्ये गेले आहेत. आता ते तिसऱ्या पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत, असा टोला ठाकरेंनी राहुल नार्वेकर यांचं नाव न घेता लगावला. महाराष्ट्राचं वाटोळं करायचं होतं तर भाजपनं सत्ता काबीज का केली, असा सवाल त्यांनी विचारला.

 

भाजपचे मूळ कार्यकर्ते कुठे आहेत, असा प्रश्न विचारत आदित्य ठाकरेंनी भाजपच्या नेत्यांची यादीच वाचली. ‘पंकजा ताईंना आता उमेदवारी दिली असली तरीही त्यांच्या मनात काय खदखद आहे ती त्यांनाच विचारा. पूनम ताई कुठे आहेत ते विचारा. प्रकाश मेहता कुठे आहेत? राज पुरोहित कुठे आहेत ते विचारा. एकनाथ खडसेंच्या बाबतीत काय झालं? दोन पक्ष संपवण्यासाठी मी आलो असं तुम्ही म्हणालात.पण त्या प्रयत्नात तुम्ही भाजपलाच संपवलं’, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

 

मूळ भाजप आता कुठे आहे, असा सवाल करत आदित्य यांनी सध्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या आकडेवारीकडे लक्ष वेधलं. ‘सध्याचे मुख्यमंत्री २०२२ मध्ये आयात केलेले आहेत. त्यांच्यासोबतचे १० आमदार मंत्री झाले. अजित पवारांसोबतचे ९ आमदार मंत्री झाले. भाजपचे १० मंत्री आहेत. त्यातले केवळ ६ मूळचे भाजपचे आहेत. स्वत:च्या अहंकारासाठी आमचं सरकार पाडलं. पण भाजपचे मूळ कार्यकर्ते आहेत कुठे?’, असा प्रश्न त्यांनी विचारला.

 

मनसेचे मुंबईतील ६ नगरसेवक फोडून उद्धव ठाकरेंनी फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात केली होती, असा आरोप राज ठाकरेंनी नुकताच जाहीर सभेत केला होता. या आरोपाला आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं. त्यांनी पक्ष स्थापन करुन २० वर्षे झाली. मात्र अशी एक घटना सांगा, जेव्हा आम्ही त्यांच्यावर टीका केली, असं आदित्य म्हणाले. काही नात्यांवर आपण बोलायचं नसतं, असं घरातून सांगितलं आहे. आमच्याकडे मनसेचे जे नगरसेवक निवडून आले, त्यातले काही आमदारही झाले होते. आता आमच्यातून गेलेल्या गद्दारांची जशी अवस्था झालीय, तशी परिस्थिती त्या नगरसेवकांची झाली नव्हती, असं उत्तर आदित्य यांनी दिलं.

Post Views: 49
Previous Post

मध्यप्रदेश : भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू

Next Post

हवामान खात्याच्या अंदाजनुसार पुढील दोन दिवस उष्णतेची लाट असणार आहे.

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
हवामान खात्याच्या अंदाजनुसार पुढील दोन दिवस उष्णतेची लाट असणार आहे.

हवामान खात्याच्या अंदाजनुसार पुढील दोन दिवस उष्णतेची लाट असणार आहे.

ताज्या बातम्या

अक्कलकोट तालुक्यात रानडुकराचा हैदोस – हल्ल्यात तीन शेतकरी जखमी 

May 20, 2026
पंढरपूरच्या सौरभ डिंगरेच्याकलेचा फ्रान्स मधील कान्स महोत्सवात डंका….!

पंढरपूरच्या सौरभ डिंगरेच्याकलेचा फ्रान्स मधील कान्स महोत्सवात डंका….!

May 20, 2026
मायक्रोग्रीनच्या जनजागृती बाबत गार्डन लव्हर्स तर्फे प्रदर्शन

मायक्रोग्रीनच्या जनजागृती बाबत गार्डन लव्हर्स तर्फे प्रदर्शन

May 20, 2026
क्षमंदिर समितीकडून भाविकांना सुखद धक्का – उष्माघातापासून वाचण्यासाठी विठ्ठलाच्यादर्शन रांगेत स्प्रिंकलरची सुविधा

क्षमंदिर समितीकडून भाविकांना सुखद धक्का – उष्माघातापासून वाचण्यासाठी विठ्ठलाच्यादर्शन रांगेत स्प्रिंकलरची सुविधा

May 20, 2026
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त १२१ जणांचे रक्तदान

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त १२१ जणांचे रक्तदान

May 20, 2026

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर २ उपळाई (ठों)चा शिष्यवृत्ती परीक्षेत 26 विध्यार्थी पात्र

May 20, 2026
गणेश पाटील यांची राज्य राखीव पोलीस दलात निवड

गणेश पाटील यांची राज्य राखीव पोलीस दलात निवड

May 20, 2026

मोबाईल लांबविला  – प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची वाहतूक – महिलेचा मोबाईल चोरीस 

May 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0872746

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697