मुदखेड ता प्र
मुदखेड तालुक्यातील दरेगा व जि.प. उच्च प्रा.शाळा दरेगाव येथे दि. १ जानेवारी २०२० रोजी पासून मदतनीस या कामावर असुन शासन निर्णयानुसार २ फेब्रुवारी २०११ च्या जि.आर प्रमाणे स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्याकडून एक वेळचे भोजन शिजवून घ्यावे व त्या अनुषंगाने कामे केली जावेत असा जि.आर. असून मुख्याध्यापक व शा.व्य.स. अध्यक्ष शाळेतील संपुर्ण कामे एकट्यालाच करण्यास सांगीतले आहेत.जि.प. उच्च प्रा.शाळा दरेगाव येथील मुख्याध्यापकानी व शा.व्य.स. अध्यक्षानी मदतनीस यांना दि.१९ जून २०२४ रोजी खालील कामे सांगीतले आहेत.
सकाळी लवकर गेट उघडून विद्यार्थी येण्या अगोदर ८ वर्ग खोल्या झाडून ऑफिस झाडने, वहांडे झाडने, ग्राऊड झाडने, २ स्वच्छतागृह आहेत ते सुध्दा वेळोवेळी साफ करणे, दुपारी मुलांना ताट देणे, जेवण वाढणे, जेवल्यानंतर खरकट झाडून काढणे ताट स्वच्छधुने, त्यांच्यानंतर दुपारी ४ वाजता दारे खिडक्या लाऊन कुलप लावणे, ऑफिसबंद करणे, गेट लाऊन नंतर घरी जाणे यांच्या व्यतिरिक्त शाळेतील कोणतेही काम सांगीतल्यास निमुटपणे करणे नकार दिल्यास किंवा हलगर्जीपणा केल्यास मदतनीस यास कामावरून तात्काळ कमी करतो असे सांगीतले.
तसेच मुख्याध्यापक आणि शा.व्य.स. अध्यक्ष यांना नियमाप्रमाणे जे काही कामे असतील ते मिलिंद कोलते हे करण्यास तयार झाले. मिलिंद कोलते यांनी मुख्याध्यापकास म्हणाले कि तोंडी सांगू नका लेखी द्या म्हटल्यास लेखी मिळणार नाही असे सांगीतले शासनाच्या नियमाप्रमाणे कामे चालणार नाहीत मी स्वतः अध्यक्ष आणि मुख्याध्यापक जे कामे सांगितले ते करावेच लागत नाहीतर नको म्हणून अध्यक्ष्यानी मला कामावर येऊ नकोस असे तोंडी सांगीतले आहे.
मिलिंद कोलते हे मागास्वर्गीय असल्यामुळे अन्याय होत आहे का. असे निवेदन दि.१९ जुन २०२४ रोजी मिलिंद गणपती कोलते (मदतनीस) जि.प. उच्च प्रा.शाळा दरेगाव यांनी गटशिक्षणाधिकारी यांना दिली व चौकशी करून माझ्यावर झालेल्या अन्याय दुर करूण मला न्याय मिळवून द्यावा अशी लेखी तक्रार निवेदनाद्वारे केली आहे.