सोनखेड: – (तभा वृत्तसेवा) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड व लोकमान्य महाविद्यालय सोनखेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि.6 सप्टेंबर,2024 रोजी Food science & processing (बी.एस्सी प्रथम वर्ष) या विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करुन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य व Food science & prcessing Faculty चे चेअरमन डा.आगलावे एच आर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करुन आपल्या प्रास्ताविक पर भाषणातून कार्यक्रमाची रुपरेषा विशद केली
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन लाभलेले डाॅ.एम.के.पाटील यांनी आपल्या भाषणातून नवीन शैक्षणिक धोरण व food science या विषयाचे महत्व विशद केले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित आसलेले प्रा.डाॅ.डी.एन.मोरे यांनी प्रमुख पाहुणे बोलताना वरील मत मांडले पूढे बोलताना त्यांनी राष्टीय शैक्षणिक धोरणाच्या सकारात्मक व नकारात्मक बाजुची अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडणी केली तसेच इतर देशात राबवण्यात येत आसलेल्या शिक्षण पद्धतीचा संक्षिप्त आढावा घेतला.
या सोबतच प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित आसलेले डाॅ.बी.एस.सुरवसे यांनीही अभ्यासक्रमा बाबत अभ्यासपूर्ण मांडणी केली.तसेच बीओएस सदस्या डाॅ.सुरेखा गायकवाड यांनीही आपले अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले.सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार व लोकमान्य ग्रामीण विकास संस्था,लोहा चे अध्यक्ष मा.रोहीदासरावजी चव्हाण साहेब हे होते आपल्या अध्यक्षीय समारोपात त्यांनी स्थानिक गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रमात बदल करने आवश्यक आसल्याचे नमूद केले .
सदरील कार्यक्रमासाठी डाॅ.साहेबराव शिंदे,व्यवस्थापन परिषद सदस्या डाॅ.सुरेखा गायकवाड(भोसले) संस्थेचे उपाध्यक्ष , सिनेट व विद्या परिषद सदस्य मा.डाॅ.नवनाथ जी चव्हाण तसेच फलोत्पादन शास्त्राचे चेअरमन मा.डाॅ.पी.व्ही.पवार यांनी ही कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी विविध महाविद्यालयातून प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ.सूर्यकांत शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन डाॅ.घोगरे जी.एस.यांनी केले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक प्रा.किरण येरावार,डाॅ.पवार एस.टी,डाॅ.आनेराव एम.एम,डाॅ.मोरे पी.के,डाॅ.केंद्रे के.सी,डाॅ.कांबळे डी.आर,डाॅ.तोटवाड छाया,डाॅ.राजपाल चिखलीकर,डाॅ.आशा धुमाळ,डाॅ.चिलपिंपरे,डाॅ.सगुरे,डाॅ.गच्चे,शिक्षकेत्तर कर्मचारी श्री सचिन कहाळेकर,श्री वानखेडे एस.एम,श्री मोरे बी.जी,श्री आकाश पवार,श्री राठोड उल्हास,श्री राठोड प्रकाश,श्री धोंडगे एम.आर,श्री शिंदे सूर्यकांत यांनी मोलाचे सहकार्य केले