[] प्रगतशील शेतकरी बांधवांचा कृषीरत्न पुरस्कार सोहळ्याचे हदगावात आयोजन []
हदगाव तालुका प्रतिनिधी :-
हरितक्रांतीचे प्रणेते महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कल्याणी प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा यांच्या संयुक्त विद्यामानाने हदगाव- हिमायतनगर क्षेत्रातील निवडक प्रगतशील शेतकऱ्यांची कृषीरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून एकूण ९४ हजार शेतकऱ्यांपैकी ३१ शेतकऱ्यांची सन्मानासाठी निवड झाल्याचे पुरस्कार निवड समितीचे प्राध्यापक कैलास राठोड यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रसिद्धी पत्रकारद्वारे करण्यात आले.
सदर कृषी रत्न पुरस्कार वितरण सोहळा व शेतकरी मेळावा हा दि.१ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजता देवराव सोनुले मंगल कार्यालय तामसा रोड हदगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. सदरील कार्यक्रमासाठी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर पाटील कदम अध्यक्ष स्थानी असून प्रवीण साले, किशोर देशमुख, संजय कौडगे, बालासाहेब पांडे, रामराव वडकुते, रामदास पाटील सुमठाणकर, नितीन भुतडा ,आ. नामदेव ससाने ,बाबुराव कोहळीकर ,सुधाकर भोयर, नानासाहेब उद्धटवाड, सुधाकर पाटील सोनारीकर ,चंद्रशेखर कदम पाटील, प्रकाश राठोड ,आशिष वाजपेयी, एड. रावसाहेब देशमुख आदी प्रमुख पदाधिकारी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.