शहरातील.एम.एस.ई.बी.च्या ढिसाळ कारभारामुळे शहरातील हालगर्जीपणामुळे अनेक डीपी उघड्यावर जिवीत हानी होण्याची दाट शक्यता.
लोहा.
शहरातील एम.एस.ई.बी च्या अभियंत्याच्या ढिसाळ कारभारामुळे आणी जबाबदारीच्या हालगर्जीपणामुळे अनेक डीपी उघड्यावर आसल्याने राञीच्या वेळेस प्रवास करताना किंव्हा अचानक वाहानाची धडक ़झाली तर त्यामधील प्रवाशांची जिवीत हानी होण्याची दाट शकेता नाकारता येत नाही अशे अनेक ठिकाणी डी.पी उघड्यावर आहेत.
शेतकऱ्याच्या शेतातुन मुख्या लाईनचे केबल झाडे,झुडप्पे, वृक्ष गराड्याच्या विळख्यात आहेत. चालू विजेचे केबल लपलेले आहेत या निष्काळजीपणामुळे एखाद्या शेतकऱ्याला जिव गमवावा लागेल याची नांदेड एम.एस.ई.बी परिमंडळच्या मुख्या कार्येकारी अभियंत्यांनी दखल घेऊन .लोहा संबंधीत एम.एस.ई.बी शहर व ग्रामिण अभियंत्यांची चौकशी करावी अशी मागणी डी.पी जवळ असणाऱ्या शहरातील नागरिकांची मागणी आहे .हि मागणी पुर्ण झाली नाही तर शहरातील एम.एस.ई.बी कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसण्याचा सज्जड इशारा दिला आहे.अशी माहिती डी.पी ग्रस्त व केबल ग्रस्त शेतकरी व नागरिकानी सांगितली.
शहरात विज वितरण कंपनीचा मनमानी कारभार चालु आहे यांच्या निष्काळजीपणामुळे अप्रिय घटना घडु शकते शहरात एम.एस.ई.बी चे कार्यालय असुन नसल्यासारखे आहे.यामुळे जनतेचा खेळ खंडोबा होत आसल्याचे बघायला मिळत आहे. या घटनेची दखल घेण्यास जबाबदारी अधिकारी नाही . शहरातील एम.एस.ई.बी चे शहर व ग्रामीण चे अभियंता यांच्याकडे तक्रार घेऊन गेले की डींग डॉंग करुन तक्रारदाराला बाहेरचा रस्ता दाखवला जातात.
शहरात अनेक गल्ली बोळात, मुख्य रस्त्यावर उघड्या डीपी मोडकळीस आलेल्या आहेत वाहातुकीला अडथळा ठरत आहेत याकडे अभियंतेला बघायला वेळ मिळत नाही. त्यावर तोडगा काढला जात नाही.कार्यालयाला शासनाचे वाहान जनतेसाठी दिलेले आसते जनतेला आडचन आली तर तो अधिकारी तात्काळ त्या घटनास्थळी पोंहचला पाहीजे हा शासनाचा उद्देश असतो पण हे अधिकारी रजिस्टरला दौरे टाकुन नाते गोत्याच्या दारात शासनाचे वाहान उभे करुन आपल्या नातेगोत्याला प्रतिष्ठा कशी मिळावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शासनाच्या वाहानाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन नातेवाईकाच्या दारा समोर उभे केले जाते.
शेतकऱ्याचा शेतातुन अनेक उच्च दाबाच्या विजेचे केबल गेले आहेत पण ते केबल झाडा झुडप्पात लपलेले आहेत सध्या पावसाळ्याचे दिवश आहेत जर झाडा लागुन विज उतरली तर झाला खाली आसऱ्याला बसलेले शेतकरी जिवाशी मुखातील याकडे अभियंत्यांला बघायला वेळ मिळत नाही, किंव्हा उच्च दाबाचे केबल मोकळे करायला जबाबदारी दाखवली जात नाही.अनेक घटनेमुळे शेतकरी व नागरिक हैराण आहेत नांदेड विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन लोहा येथील एम.एस.ई.बी.च्या कार्यालयाचा कारभार सुरळीत चालू करुन द्यावा अन्यथा आपल्या कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसण्याची वेळ येऊ देऊ नये असे अनेक प्रगतीशिल शेतकरी व नागरिकांनी हाकिकीकत सांगीतली आहे.