उमरी नगरपरिषद हद्दीतील सरकारी जमिनीचा कोट्यावधी भुखंड घोटाळा .
* मोजणी करून शासनाच्या ताब्यात घ्यावे माजी नगराध्यक्ष सुभाष पेरेवार यांची मागणी .
उमरी ( प्रतिनिधी ) उमरी नगर परिषद हद्दीतील सरकारी जमीन सर्वे नंबर 154/3 ची भूमी अभिलेख कार्यालय मार्फत मोजनी करून ती जागा शासनाचे ताब्यात घेण्यात यावी असे पत्र तहसीलदार उमरी यांना शिवसेना तालुकाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष सुभाष पेरेवार यांनी दिले .
उमरी नगर परिषद हद्दीत सर्व्ह नंबर 154/3 मधील जमीन हे महसूल पुराव्यानुसार सरकारी जमीन मनून नोंद आहे . सदरील जमीन क्षेत्र फळ 1 हेक्टर 6 आर असून ह्या जमिनीवर बेकायदेशीर पलोटिंग पाडून ते विक्री केल्या गेल्याचा संशय आहे . संबंधित जमनीचा भूमी अभिलेख कार्यालय यांनी 11/05/1994 रोजी दिलेल्या नकाशा चे अवलोकन केले असता संबंधित जमीन आज घडीला अतिक्रमित असल्याचे दिसून येत आहे .
याची तहसील दार साहेबांनी भूमी अभिलेख मार्फत मोजणी करून ही जागा शासनाचे ताब्यात घ्यावे असे ह्या पत्राद्वारे शिवसेना तालुकाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष सुभाष पेरेवार यांनी म्हटले आहे . या वेळी हे पत्र तहसील दार साहेबांना देताना शिवसेना तालुकाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष सुभाष पेरेवार, उप तालुका प्रमुख प्रवीण पाटील ढगे, तालुका संघटक श्रीनिवास जाधव , लक्ष्मण सोंगाडे , माधव सोळंके आदी उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार प्रशांत थोरात यांनी सदरील निवेदनाचे अनुषंगाने तहसीलदार उमरी यांनी तालुका भूमी अभिलेख कार्यालय उमरी यांचे नांवे एक पत्र काढून मोजणी करुन घेण्यात येईल असे आश्वासन सुभाष पेरेवार यांना दिल्याचे समजते.