भोकरदन : सर्व जनतेस व कार्यकर्त्यांना कळविण्यात येते की, दिनांक 7/7/2024 रोजी रविवारला दुपारी चार वाजता शासकीय विश्रामगृह अंबड चौफुली जालना येथे पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय संघटन सचिव मा. मू. एम. बी. मगरे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीस पी पी आय डी पक्षाचे राज्य उपाध्यक्ष मा. मू. एन. यू. जाधव, मूलनिवासी संघाचे राज्य कोषाध्यक्ष मा. मू. सिद्धार्थ पवार, पी पी आय डी पक्षाचे संभाजीनगर/ औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष मा. मू. भास्कर गंगावणे हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
सदर बैठकीत (1) मागील कार्यकालाचा अहवाल सादर करणे(2) नवीन जिल्हा कार्यकारिणीची निवड करणे(3) आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवाराचे नाव निश्चित करणे(4) पक्ष वाढीसाठी कॅडर कॅम्प व पब्लिक कार्यक्रमाचे नियोजन करणे आणि(5) ऐनवेळी अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या विषयावर चर्चा करणे.
या सूचीवर चर्चा करण्यात येणार असून योग्य ते निर्णय घेण्यात येणार आहे. तरी जालना जिल्ह्यातील पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना व आजी-माजी पदाधिकाऱ्यांना सुचित करण्यात येते की त्यांनी या बैठकीस न चुकता आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन पक्षाचे जालना जिल्हा प्रभारी तथा राज्य कार्यकारिणी सदस्य मा. मू. ॲड. एफ. एच. सिरसाठ व शिवलाल अक्षय यांनी केले आहे,