भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचे कोणतेही विधान आम्ही गांभीर्याने घेत नाही अशी टीका शिवसेनेचे लोकसभा प्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी केली.
मागच्या काही सभांमध्ये जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही असे विधान केले होते मात्र दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे या गावात त्यांनी फेटा बांधला, यावरून राम सातपुते हे आपल्या विधानाशी किती प्रामाणिक असतात असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे त्यांच्या विधानाला शिवसेना गांभीर्याने घेत नाही असा टोला बरडे यांनी हाणला.