राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. निवडणूक खर्चाची नोंद अपूर्ण असल्याने ही नोटीस बजावण्यात आली आहे.
आज सुनील तटकरे यांनी केलेल्या निवडणूक खर्चाची तपासणी होणार आहे. लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाची उमेदवारांच्या खर्चावर विशेष नजर असते. निवडणुकीच्या काळात उमेदवारांकडून नेमका किती पैसा खर्च केला जातो, यावर निर्णय अधिकारी लक्ष ठेवून असतात.
उमेदवारांना विविध बाबींवर खर्च करण्याच्या रकमेची मर्यादा निश्चित करुन दिलेली असते. त्यामुळे आता सुनील तटकरे यांची चौकशी होणार आहे.