उमेदवारांना मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर येणाऱ्या प्रत्येकाला पांढरी चिठ्ठी अन् ५०० रुपये वाटताना पोलिसांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चेतन नागेश गायकवाड (वय- २५, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नं . ३ सोलापूर) व नरसिंग सायबण्णा कोळी (वय ३१, रा. सैफूल रेणुका नगर, हौसिंग सोसायटी, सोलापूर) अशी गुन्हा नोंदलेल्या दोघांची नावे आहेत.
शहरात मंगळवारी लोकसभा मतदार संघातील उमेदवारासाठी मतदान सुरु होते. सायंकाळी पाचच्या सुमारास सूतकर शाळेजवळील मतदान केंद्राजवळ सलगर वस्तीचे पोलीस सागर मोहन बोरामणीकर हे कर्तव्यावर होते. यावेळी मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांना पसंतीच्या उमेदवाराला मतदान करावे असे आवाहन करीत त्यांना पांढरी चिठ्ठी आणि प्रत्येकी ५०० रुपये देत असताना दोघांना पोलिसांनी हटकले. त्यांच्याविरुद्ध सलगर वस्ती पोलीस ठाण्यात भा. दं. वि. १७१ (ब)(ई) ३४ अन्वये गुन्हा नोंदला आहे. अधिक तपास फौजदार पवार करीत आहेत.