Thursday, April 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी आमदार श्रीपतराव शिंदे निधन

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
October 15, 2023
in death news
0
जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी आमदार श्रीपतराव शिंदे निधन
0
SHARES
26
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र प्रदेश जनता दलाचे माजी अध्यक्ष, जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, माजी आमदार ॲड. श्रीपतराव शिंदे (८७) यांचे शनिवारी सायंकाळी पुण्यात निधन झाले. गेले काही दिवस ते रुबी हॉस्पिटल येथे उपचार घेत होते. समाजवादी चळवळीतील मोठा आधारस्तंभ गमावल्याची भावना व्यक्त करण्यात आली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजतात गडहिंग्लज परिसरात शोककळा पसरली.

त्यांचे पार्थिव आज, रविवारी त्यांच्या मूळगावी आणून त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी उर्मिलादेवी, कन्या डॉ. रचना संजय थोरात (कराड), प्रा. स्वाती महेश कोरी (माजी नगराध्यक्षा, गडहिंग्लज), चार भाऊ, बहिण बहीण वसुधा पवार, जावई, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. ‘सायबर’चे संस्थापक दिवंगत डॉ. ए.डी. शिंदे, दिवंगत माजी उपायुक्त वसंतराव शिंदे, पशुसंवर्धन कर्मचारी संघटनेचे माजी राज्याध्यक्ष डॉ. विजयराव शिंदे यांचे ते बंधू, तर ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांचे ते मेव्हणे होते.

स्वातंत्र्यपूर्व काळात स्वत:च्या घरात खाजगी शाळा चालवणारे दिनकरमास्तर यांचे पुत्र म्हणून शिंदे यांची ओळख होती. वडिलांनी दिलेले संस्कार आणि राष्ट्र सेवा दलाने दिलेल्या विचारात त्यांची जडणघडण झाली. त्यांनी माध्यमिक शिक्षक म्हणून ही काम पाहिले होते. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी समाज हितासाठी लढा दिला होता. कोल्हापूर जिल्ह्यात जनआंदोलनाचा चेहरा बनलेले आणि परिवर्तनवादी विचाराचे जननायक अशी त्यांची ओळख होती. आप्पासाहेब नलवडे सहकारी कारखान्याचे ते माजी चेअरमनही होते. गोर-गरीब, कष्टकरी, कामगार, शेतकरी, देवदासी आणि सर्वहारा समाज आदींचा आवाज बुलंद केला.

कसबा नूल या गडहिंग्लज तालुक्यातील गावातून शिंदे यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. सामाजिक, सहकार, शैक्षणिक, राजकीय अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी सुमारे पन्नास वर्षांहून अधिक काळ काम केले. आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याचे ते अध्यक्ष होते. गडहिंग्लज नगरपालिका त्यांनी अनेक वर्ष जनता दलाच्या ताब्यात ठेवली. पाच वर्षांपूर्वी त्यांची मुलगी स्वाती कोरी या तेथे नगराध्यक्ष होत्या. महाराष्ट्र सीमा प्रश्न लढ्यात ते अग्रभागी होते. राष्ट्र सेवा दलात त्यांची जडणघडण झाली. समाजवादी विचारधारेचा त्यांच्यावर अखेरपर्यंत प्रभाव राहिला. सुरुवातीच्या काळात त्यांनी माध्यमिक शिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर गडहिंग्लज येथील न्यायालयात वकिली केली.

देवदासी प्रथा निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, विषमता निर्मूलन, पूरग्रस्त, धरणग्रस्त, अंगणवाडी सेविका, एस.टी., नगरपालिका व साखर कामगार, शेतकरी-शेतमजूर व उपेक्षितांच्या प्रश्नांसाठी त्यांनी अखेरपर्यंत संघर्ष केला. आणीबाणीच्या काळात दीड वर्षाचा तुरूंगवासही त्यांनी भोगला होता.

Post Views: 136
Previous Post

समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू, २३ जखमी

Next Post

समृद्धी महामार्ग अपघात – मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
समृद्धी महामार्ग अपघात – मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर

समृद्धी महामार्ग अपघात - मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर

ताज्या बातम्या

परमार्थामध्ये निष्ठा ठेवल्यास परमेश्वर आपोआप भेटायला येतो

परमार्थामध्ये निष्ठा ठेवल्यास परमेश्वर आपोआप भेटायला येतो

April 16, 2026
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलातून स्त्रीमुक्तीचा मार्ग  दाखविला

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलातून स्त्रीमुक्तीचा मार्ग  दाखविला

April 16, 2026
ग्रामीण कथा लेखिका संध्या धर्माधिकारी यांच्या उत्तुंग कामगिरीबद्दल सन्मान

ग्रामीण कथा लेखिका संध्या धर्माधिकारी यांच्या उत्तुंग कामगिरीबद्दल सन्मान

April 16, 2026
आरोही भोसले चौथीच्या विद्यार्थीनीची बचत; शोळेला दिले आठ घड्याळे

आरोही भोसले चौथीच्या विद्यार्थीनीची बचत; शोळेला दिले आठ घड्याळे

April 16, 2026
जनमंगल पतसंस्थेतर्फे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

जनमंगल पतसंस्थेतर्फे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 16, 2026
शिका संघटित व्हा, संघर्ष करा’ भारतरत्न डॉ. आंबेडकरांचा विचारच समाज परिवर्तनाचा खरा मार्ग

शिका संघटित व्हा, संघर्ष करा’ भारतरत्न डॉ. आंबेडकरांचा विचारच समाज परिवर्तनाचा खरा मार्ग

April 16, 2026
जनमंगल फाउंडेशनतर्फे पाणपोईचे उद्घाटन

जनमंगल फाउंडेशनतर्फे पाणपोईचे उद्घाटन

April 16, 2026
निमा स्थापना दिनानिमित्त शासकीय रुग्णालय येथे औषधी वनस्पती लागवड

निमा स्थापना दिनानिमित्त शासकीय रुग्णालय येथे औषधी वनस्पती लागवड

April 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0812302

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697