करकंब – पोथी पुराणे कितीही वाचा,त्यापेक्षा देवावर असणारी निष्ठा महत्त्वाची आहे.मनापासून निष्ठा ठेवल्यास परमेश्वर आपोआप भेटायला येतो.श्रीसंत सावता माळी महाराज यांनी देवाच्या नामस्मरणात रंगून आपल्या कर्तव्याप्रती निष्ठा ठेवली.भक्तीपोटी पंढरीचा पांडुरंग भेटीस आला.असे विचार हभप कैलास महाराज केंदळे (धर्मपुरी) यांनी व्यक्त केले.
करकंब येथे श्रीसंत सावता माळी महाराज यांच्या चंदनउटी निमित्ताने शुक्रवार पेठ येथील श्रीसंत सावतामाळी मंदिरात आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण,श्रीसंत सावता महाराज चरित्र वाचन व समाप्ती दिवशी काल्याच्या कीर्तनात केंजळे महाराज यांनी भक्ती,संत, देव इत्यादी बरोबरच श्रीकृष्णाच्या विविध लिला सांगून वातावरण भक्तिमय करुन टाकले.
या सप्ताहात हभप कल्याण महाराज सरडे,श्रीहरी साळुंखे,बळीराम व्यवहारे,राणी माळी,बापूसाहेब ढगे,श्रीकांत आरोळे,शंकर महाराज गोसावी यांची किर्तने झाली.सप्ताह यशस्वी व्हावा यासाठी कांतीलाल बुवा खारे,चंद्रकांत सुरवसे,दत्तात्रय काळे,नंदू माळी,लक्ष्मण जाधव,राजेंद्र करपे,छगन खारे,शालन खारे,पोपट माळी,विश्वास जोशी,आण्णा खारे,बाबा माळी,नाना खारे,महादेव पुजारी,रवी माने इत्यादींनी परिश्रम घेतले.

























