सोलापूर : नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन अर्थात निमा या इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्शनर यांच्या संघटनेच्या 78 व्या स्थापना दिनानिमित्त निमा सोलापूर शाखेकडून आरोग्य मंदिर ,मौजे उळे, तालुका दक्षिण सोलापूर या ठिकाणी आयुर्वेदिक औषधी वनस्पती व वृक्ष लागवड करण्यात आली.
यामध्ये अडुळसा, आवळा, रिठा, अर्जुन, तुळस, लाजाळू ,नागवेली, कडिपत्ता, कांचनार, खुरासनी ओवा, इत्यादी विविध गुणुपयोगी औषधी वनस्पती लावण्यात आल्या. यावेळी निमा सोलापूरचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर विनायक टेंभुर्णीकर ,निमा सोलापूरचे अध्यक्ष डॉक्टर नागनाथ जिड्डीमनी, उपाध्यक्ष डॉ. सचिन बोंगरगे ,कोषाध्यक्ष डॉ. प्रवीण ननवरे, एक्झिक्युटिव्ह मेंबर श्री कुंभार , डॉ उत्कर्ष वैद्य,निमा सेंट्रल कार्यकारणी सदस्य डॉ
राजश्री मठ ,डॉ. अनुश्री मुंढेवाडी, निमा वूमन फोरम सोलापूर अध्यक्ष डॉ. श्रुती मराठे आणि उळे गावच्या सरपंच अंबिका कोळी, ग्रामपंचायत सदस्य मनोज गुंड व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उळे उपकेंद्राच्या सीएचओ डॉ. मंजुषा देशमुख – ननवरे व स्टाफ यांनी परिश्रम घेतले.



























