Saturday, August 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आमदार निवासाबाहेर मराठा आंदोलकांचा हल्लाबोल, हसन मुश्रीफांची गाडी फोडली

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 1, 2023
in maharashtra
0
आमदार निवासाबाहेर मराठा आंदोलकांचा हल्लाबोल, हसन मुश्रीफांची गाडी फोडली
0
SHARES
61
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई: गेल्या दोन दिवसांमध्ये उग्र स्वरुप धारण केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाची धग अजूनही कायम आहे. बीड आणि धाराशीव जिल्ह्यात हिंसक आंदोलनामुळे झालेली परिस्थिती निवळत असतानाच आता मुंबईत मराठा आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा आंदोलकांनी बुधवारी सकाळी आकाशवाणी येथील आमदार निवासाच्या बाहेर उभी असलेली मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. तीन तरुणांनी ‘एक मराठा लाख मराठा’ अशी घोषणाबाजी करत मुश्रीफ यांच्या गाडीच्या काचा फोडून टाकल्या. आमदार निवासाचा परिसर हा मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे आता या परिसरातही मराठा आंदोलनाचा भडका उडू शकतो, ही शक्यता लक्षात घेऊन या परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड करणारे तिघेही छत्रपती संभाजीनगर येथे राहणारे आहेत. या तिघांची ओळख पटली असून त्यांची नावे अजय साळुंखे, संतोष निकम, दीपक सहानपुरे अशी आहेत. या तिघांना मरिनड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे. या घटनेनंतर कागलमध्येही हसन मुश्रीफ यांच्या घराबाहेरील सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी मराठा आंदोलकांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या दोन गाड्यांची तोडफोड केली होती. त्यानंतर संबंधित आंदोलकांच्या सुटकेसाठी मराठा संघटनांच्या माध्यमातून पोलीस ठाण्यात वकील पाठवण्यात आले होते.

मुंबईत मंत्रालयाच्या परिसरात हा प्रकार घडला. मंत्रालयाचा परिसर हा अत्यंत संवेदनशील परिसर आहे. मंत्रालयाच्या गार्डन गेटच्याच बाजूला आमदार निवास आहे. या आमदार निवासच्या खाली मंत्री हसन मुश्रीफांची गाडी उभी होती. आंदोलकांनी मुश्रीफांची गाडी हेरुन तिची तोडफोड केली आहे. मंत्रालय आणि आसपासच्या परिसरात आता पोलीस फौटफाटा वाढवण्यात आला आहे.

भुजबळांवर रोष

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा राज्यातील ओबीसी नेते छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या येवल्यात सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध दालनांत लावलेल्या भुजबळ यांच्या प्रतिमा काढून घेतल्या. या प्रतिमा बाजार समितीच्या बाहेर आणून त्यांची तोडफोडही केली. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अचानकपणे ‘एक मराठा, लाख मराठा’ अशी घोषणाबाजी करीत २५ ते ३० जणांचा जमाव बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात घुसला. बाजार समितीवर छगन भुजबळ यांच्या गटाची सत्ता असल्याने सभापती व इतर दालनांत भुजबळ यांच्या प्रतिमा लावलेल्या होत्या. जमावाने जोरदार घोषणाबाजी करीत या प्रतिमा भिंतीवरून हटविल्या. दरम्यान, येवला येथील भुजबळांच्या संपर्क कार्यालयाबाहेर पोलिसांचा फौजफाटा ठेवण्यात आला आहे.

आमदार हिरेंच्या कार्यालयाला ठोकले टाळे
सिडको : सकल मराठा समाज सिडको विभागाच्या वतीने सोमवारपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. मंगळवारी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी भाजप आमदार सीमा हिरे यांनी राजीनामा द्यावा यासाठी त्यांच्या सिडको भागातील कार्यालयाला टाळे ठोकले. ‘एक मराठा, लाख मराठा’ म्हणत ‘आमदार सीमाताई हिरे राजीनामा द्या’ अशा घोषणा देण्यात आल्या.

Post Views: 156
Previous Post

सोलापूर – पाण्यासाठी आजी-माजी आमदार आक्रमक

Next Post

राज्यात ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर, पुण्यातील ५ तालुक्यांचा समावेश, मदतीसाठी केंद्राला विनंती

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
राज्यात ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर, पुण्यातील ५ तालुक्यांचा समावेश, मदतीसाठी केंद्राला विनंती

राज्यात ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर, पुण्यातील ५ तालुक्यांचा समावेश, मदतीसाठी केंद्राला विनंती

ताज्या बातम्या

तर महाराष्ट्रातले विडी उद्योग बंद करू तेलंगणात जाऊ #solapurnews #marathinews #viral

August 22, 2026

अरे वा….मनपा महिला व बालकल्यान समिती महिला मुलींसाठी कल्याणकारी योजना राबवणार #solapurnews

August 22, 2026

केंद्राच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर खासदार ज्योती वाघमारे यांची निवड #news

August 22, 2026

दत्तक लेकीचे मुख्यमंत्र्यांनी केले विधिवत पुनर्विवाह #viral #maharashtranews

August 22, 2026

अखेर तिने मागितली माफी….. #viral

August 22, 2026

अवघड झाले cjp वाल्यांचे…… #viral

August 22, 2026

रागात डोंगरावरून उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई वडिलांचाही मृत्यू #viral #marathinews

August 22, 2026

सोलापूर जिल्ह्याला मिळाले शासकीय रेखाकला परीक्षेचे मूल्यमापन केंद्र

August 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1101393

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!