Saturday, May 9, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कर्नाटक आणि तेलंगणामध्ये मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण; महाराष्ट्रात अडचण काय? संभाजीराजेंचा सवाल

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 29, 2023
in maharashtra
0
कर्नाटक आणि तेलंगणामध्ये मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण; महाराष्ट्रात अडचण काय? संभाजीराजेंचा सवाल
0
SHARES
30
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मराठा आरक्षणावर छत्रपती संभाजीराजेंनी राज्य सरकारला सवाल विचारला आहे. कर्नाटक आणि तेलंगणामध्ये मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिले जाते. तर महाराष्ट्रात अडचण काय? असे ते म्हणाले आहेत.

 

 

‘देशातील २५ राज्यांनी विविध समाजांना ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण दिले आहे. कर्नाटक आणि तेलंगणमध्ये तेथील मराठा समाजाला ओबीसी कोट्यामधून आरक्षण दिले जाते. मग महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाबाबतच काय अडचण उभी राहत आहे,’ असा प्रश्न संभाजीराजे छत्रपती यांनी मंगळवारी केला. मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे यांनी दिल्ली गाठली आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष व माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्याशी चर्चा केली.

 

 

कर्नाटक आणि तेलंगणने मागासवर्गीय आयोगाकडे विनंती केली आहे की, आता आम्हाला केंद्राच्या यादीमध्ये घ्या. तेही होण्याची शक्यता आहे. मग मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आणि सरकारची आता जबाबदारी आहे. निश्चितपणे प्रश्न सुटू शकतात; पण त्यासाठी तयारी हवी. मराठा आरक्षणाबाबत माझी मागासवर्ग आयोगासोबत सकारात्मक चर्चा झाली. आरक्षणाचा मार्ग केंद्र सरकार काढू शकते. दिल्लीच्या मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा आहे. त्यामुळे ते व केंद्र सरकार ‘जबाबदारी नाही’ असे म्हणू शकत नाहीत. केंद्राने मराठा समाजाची मागणी गांभीर्याने घेण्याची आवश्यक आहे. आज आपण मांडलेले मुद्दे मागासवर्ग आयोगाला पटले आहेत,’ असे संभाजीराजे म्हणाले.

 

‘एका राज्यात आरक्षण असलेल्या जातींना दुसऱ्या राज्यांत आरक्षण का नाही? मनोज जरांगे पाटील यांनी दावा केल्यानुसार मराठा आणि कुणबी एकच असल्याचे पुरावेही सापडत आहेत. या कागदपत्रांचा आधार घेऊन मराठा जातीचा समावेश आरक्षण मिळू शकणाऱ्या प्रवर्गात करावा, अशी सूचना तुम्ही राज्य मासागवर्ग आयोगास करू शकता का, असा प्रश्न आम्ही केंद्रीय आयोगाला विचारला. त्यावर आज उत्तर मिळालेले नाही. मागच्या आठवड्यात आम्ही राज्य मागासवर्गीय आयोगाची भेट घेतली होती. अनेक प्रश्न समजून घेण्यासाठी त्यानंतर केंद्रीय मागासवर्गीय आयोगाची भेट घेतली. आरक्षणाबाबत केंद्र सरकार बाजूला (तटस्थ) राहू शकत नाही असे आमचे मत आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.

 

 

‘मराठा आरक्षणाबाबत संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आमच्या आयोगाशी चर्चा केली व निवेदन दिले. त्यांनी काही सूचनादेखील केल्या. याबाबत आम्ही राज्य आयोगासोबत चर्चा करू व त्यांनी पाठवलेल्या अहवालाचा विचार करू, असे हंसराज अहिर यांनी सांगितले. मराठा आरक्षणाबाबतचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने जे मुद्दे मांडले, ते संभाजीराजे यांनी पत्रकारांना वाचून दाखवले. ‘मराठा समाज मागास नाही, असे न्यायालयाने म्हटले होते. त्या मुद्द्याचाच फटका मराठा समाजाला बसला आहे. त्याचा फेरविचार करणे गरजेचे आहे. राज्य सरकारने क्युरेटिव्ह याचिकेतही मराठा समाजाचे आर्थिक-शैक्षणिक-सामाजिक मागासपण हा मुद्दा जोरकसपणे मांडणे गरजेचे आहे,’ असे संभाजीराजे म्हणाले.

Post Views: 182
Previous Post

तुमच्या जातीयवादी आजोबांनी आरक्षण घालवलं, पडळकर-रोहित पवार यांच्यात ऑनलाईन चकमक

Next Post

हिवाळी अधिवेशनाआधीच नवा ट्विस्ट… विधानभवनाबाहेरून

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
हिवाळी अधिवेशनाआधीच नवा ट्विस्ट… विधानभवनाबाहेरून

हिवाळी अधिवेशनाआधीच नवा ट्विस्ट... विधानभवनाबाहेरून

ताज्या बातम्या

डॉ लक्ष्मीनारायण बोल्ली स्मृती साहित्य पुरस्काराचे वितरण

May 9, 2026

कुस्ती नव्हे लग्नात बुटावरून हाणामारी #viral #news

May 9, 2026

अल्पवयीन मुलीवर अत्याचार २० वर्षांची दिली शिक्षा #solapurnews #viral

May 9, 2026

ट्रिपल मर्डरमधील पप्पूला पोलिसांनी केले जेरबंद #solapurnews #marathinews #viral

May 9, 2026

मनपाच्या अतिक्रमण विभागाची लक्ष्मी मंडईत धडक मोहीम #solapurnews #viral #marathinews

May 9, 2026

सोलापुरात पकडला आणखी एक भोंदूबाबा #solapurnews #marathinews #viral

May 9, 2026

एम्प्लॉयमेंट चौकात ट्रान्सफॉर्मरला रात्री अचानक लागली आग #solapurnews #viral

May 9, 2026

बंगालमध्ये घुमला मुख्यमंत्री शुभेन्दू अधिकारी यांचा शपथविधीचा शब्द #viral #news

May 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0855284

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697