कुर्डूवाडी (प्रतिनीधी) –
भारतीय रेल्वे विभागाने रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी अलीकडेच अमृत भारत स्टेशन योजना सुरू करण्यात निर्णय घेतला आहे .यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघातील कुर्डवाडी ,पंढरपूर चा समावेश व्हावा म्हणून खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर हे सातत्याने रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्या कडे पाठपुरावा करीत होते .त्यांना यश आले संबंधीत विभागाचे पत्र रेल्वे कार्यालयस दिले गेले सध्या, दिनांक ६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे संपूर्ण भारतातील अमृत रेल्वे स्टेशनचं उद्घाटन करणार आहेत . यावेळी कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनवर लोकसभा मतदारसंघातील लोक प्रतिनिधी व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये कुर्डवाडी रेल्वे स्टेशनचा सुद्धा समावेश केला गेला आहे . त्यामुळे कुर्डवाडी रेल्वे स्टेशन चा लवकरच कायापालट होणार आहे .या योजनेत भारतीय रेल्वेच्या अपग्रेडेशन/आधुनिकीकरणासाठी 1275 स्थानके घेण्याची कल्पना आहे. या योजनेअंतर्गत सोलापूर विभागातील कुर्डूवाडी स्थानक निश्चित करण्यात आले .
अमृत भारत स्टेशन प्लॅनमध्ये दीर्घकालीन दृष्टीकोनातून स्थानकांचा शाश्वत आधारावर विकास करण्याची कल्पना आहे. यामध्ये स्थानकात प्रवेश, परिभ्रमण क्षेत्र, वेटिंग हॉल, स्वच्छतागृहे, आवश्यकतेनुसार लिफ्ट/एस्कलेटर, स्वच्छता, मोफत वाय-फाय, प्रत्येक स्थानकावरील गरज लक्षात घेऊन ‘एक स्टेशन एक उत्पादन’ सारख्या योजनांद्वारे स्थानिक उत्पादनांसाठी कियॉस्क यांचा समावेश आहे. उत्तम प्रवासी माहिती प्रणाली, एक्झिक्युटिव्ह लाउंज, व्यावसायिक बैठकीसाठी नियुक्त जागा, लँडस्केपिंग इत्यादी सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी मास्टर प्लॅन आणि त्यांची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी.
या योजनेत इमारतीतील सुधारणा, शहराच्या दोन्ही बाजूंनी स्टेशनचे एकत्रीकरण, मल्टीमॉडल इंटिग्रेशन, दिव्यांगजनांसाठी सुविधा, शाश्वत आणि पर्यावरणपूरक उपाय, बॅलेस्टलेस ट्रॅकची तरतूद, आवश्यकतेनुसार ‘रूफ प्लाझा’, टप्प्याटप्प्याने आणि व्यवहार्यता यांचा समावेश आहे आणि ते देखील आहे. स्टेशनवर दीर्घकालीन सिटी सेंटर बांधण्याची योजना आहे. खासदार रणजितसिह यांनी मतदारसंघातील जनतेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांचे आभार मानले . माढा तालुक्यातील जनतेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, व खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांचे मतदारसंघातील जनतेच्या वतीने आभार मानतो तसेच या कार्यक्रमास जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन मंडल अध्यक्ष योगेश बोबडे यांनी केले .
Post Views: 136