Wednesday, April 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भक्त अंध होते पण गुरुही अंध निघाले, BMCच्या ठेवींवरुन उद्धव ठाकरेंचा नरेंद्र मोदींवर पलटवार…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 23, 2023
in maharashtra
0
भक्त अंध होते पण गुरुही अंध निघाले, BMCच्या ठेवींवरुन उद्धव ठाकरेंचा नरेंद्र मोदींवर पलटवार…
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उद्धव ठाकरे यांनी ष्णमुखानंद हॉलमध्ये शिवसैनिकांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात संबोधित केलं. उद्धव ठाकरे यांनी जो बायडन यांच्या घरावर एफबीआयनं टाकलेल्या छाप्याचा आणि हर्षवर्धन पाटील यांच्या वक्तव्याचा दाखला देत शिंदे गट आणि भाजपवर टीका केली. गद्दार विकले जाऊ शकतात, खोक्यांनी गद्दार विकत घेतले जाऊ शकतात. पण शिवसैनिकांचं प्रेम विकलं जाऊ शकत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आज दुपारी पत्रकार परिषद झाली, प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत आले आहेत. काही वर्षांपूर्वी कलिना येथे विद्यापीठात मी आणि रामदास आठवले एकत्र आलो होतो. पण, रामदास आठवले हे भाजपच्या कळपात गेले. त्यामुळं आज प्रबोधनकारांचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारशांचे आणि विचारांचे नातू एकत्र आले आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हिंदु्त्वाच्या नावावर एक भिंत तयार करुन पोलादी पकड तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय, असं उद्धव ठाकरे म्हणाले. महाविकास आघाडी सरकार असताना हिंदुत्त्व सोडलं आणि शरद पवारांच्या आहारी गेल्याचं सांगत सरकार पाडलं. पण, तुम्ही शरद पवारांचं फोनवरुन मार्गदर्शन घेतो असं म्हणतात, मग माझं काय चुकलं होतं, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

सुभाषचंद्र बोस हे डाव्या विचारसरणीचे आणि संघ उजव्या विचारसरणीचा आहे. सध्या सरळ सरळ वारसा हडपण्याचा डाव आहे. स्वातंत्र्य लढा, संयुक्त महाराष्ट्र या काळात त्यांचा सहभाग नव्हता. कोणी कितीही असले तरी मोदी असले तरी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव असल्याशिवाय मतं मिळत नाहीत हे तुम्ही मान्य केलंय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आपल्या कामाचेच पंतप्रधानांनी भूमिपुजन केले. तीन वर्ष आम्ही काम केले म्हणून तुम्ही भूमिपुजन करु शकलात. मोदी जे बोलले ते भयानक आहे. भक्त अंध समजू शकतो पण गुरु सुध्दा अंध आहेत. २००२ पर्यंत मुंबई मनपा तुटीत होती. ६५० कोटी तुटीत होती. तेव्हाचे आयुक्त सुबोधकुमार आणि आपल्या लोकांनी ती सशक्त केली आणि ठेवी निर्माण झाल्या आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रात येणारे उद्योग पळवले, आर्थिक केंद्र पळवले, फिल्मसिटी पळवायला आले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री ५ लाख कोटींची गुंतवणूक घेऊन गेले. मुंबई महापालिका स्वत:च्या खर्चातून रस्ता बनवत आहे. कोस्टल रोड विना टोल आपण देतोय. मनपाचा उपक्रम हा त्या ठेवीतून होत आहे. त्यातील ३०-४०% रक्कम हा कामगारांचा, भविष्य निर्वाहाच्या निधीचा, ग्रॅच्युएटी आणि इतर कामांचा आहे. त्यांना मुंबई ही सोन्याची कोंबडी वाटते, आम्हाला ती मातृभूमी वाटते. ते शाहकारी असतील पण त्यांना ती कापायची आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मराठी माणसाने रक्त सांडून मिळवली आहे. मराठी माणसाची मुंबई आपण त्यांच्या हाती जाऊ देणार नाही. ही कसली बाळासाहेबांची माणसं?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. कोश्यारींनी पदावरुन दूर होण्याची इच्छा व्यक्त केली. फार लवकर त्यांना शहाणपण सुचलं. त्यांना हाकलून द्यायला हवं होतं. महाराष्ट्रातील महापुरुषांचा छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा अपमान त्यांनी केला.महापुरुषांचा अपमान होऊनही गप्प बसणारी माणसं बाळासाहेबांची असू शकतात का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

Post Views: 85
Previous Post

के एल राहुल आणि अथिया शेट्टी अडकले विवाहबंधनात, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव !

Next Post

LIVE :- विधानभवन :- बाळासाहेबठाकरे यांच्या तैलचित्राचा अनावरण कार्यक्रम…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
LIVE :- विधानभवन :- बाळासाहेबठाकरे यांच्या तैलचित्राचा अनावरण कार्यक्रम…

LIVE :- विधानभवन :- बाळासाहेबठाकरे यांच्या तैलचित्राचा अनावरण कार्यक्रम...

ताज्या बातम्या

चेंबर दुरुस्ती, बॉक्स कल्व्हर्ट पुलची आयुक्तांनी केली पाहणी

April 22, 2026

महिला आरक्षण विधेयकाच्या निषेधार्थ भाजपने केले जोरदार आंदोलन

April 22, 2026

अतिक्रमणांवर बुलडोझर पण बसस्थानकाच्या कामावर मौन

April 22, 2026

सह्याद्री कॉलेज ऑफ नर्सिंग येथे आमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स संभाजीनगर नशा मुक्ती जनजागृती

April 22, 2026

समर्पण भावना हीच यशाची गुरुकिल्ली

April 22, 2026

पालिकेच्या 47 अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुन्हा दंड

April 22, 2026

बालमाता प्रकरणी आत्तापर्यंत 34 घटना उघड

April 22, 2026

शासकीय कर्मचाऱ्यांनी पूनम गेट समोर केली निदर्शने

April 22, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0823935

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697