पंढरपूर – दहा महिन्यांत दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून भाळवणी (ता.पंढरपूर) येथील सुमारे दीडशे महिलांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. फसवणूक झालेल्या महिलांनी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात संबंधित व्यक्ती विरोधात लेखीतक्रार दिली आहे.
या प्रकारा बाबतची सविस्तर माहिती अशी की, भाळवणी गावातील दोन व्यक्तींनी दहा महिन्यांत रक्कम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत महिलांकडून लाखो रुपये गोळा केल्याची माहिती समोर आली आहे. मुदत संपल्यानंतर महिलांनी पैशांची मागणी केली असता, संबंधितां पैकी एकजण गावातून पळून गेला, तर दुसऱ्याने हात वर केल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर फसवणूक झाल्याचे महिलांच्या लक्षात आले.
दरम्यान सोमवारी (ता.२५) पीडित महिलांनी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे यांची भेट घेऊन तक्रार मांडली. त्यानंतर अनुप्रिता शिंदे, मंगल लोखंडे व परमेश्वर गुरव यांनी राजेंद्र निराळे याच्या विरोधात फसवणुकीची लेखी तक्रार दिलीआहे. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला असून, तपासात मोठा आर्थिक घोटाळा समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
————–
चौकट : ( आपली
प्रॉपर्टी विकून दहा लाखांची गुंतवणूक ) भाळवणी येथीलअ
नुप्रिता शिंदे यांनी प्रॉपर्टी विक्रीतून आलेले दहा लाख रुपये दामदुप्पटमिळण्याच्या आशेने राजेंद्र निराळे याच्याकडे गुंतवले होते. मुदत संपल्यानंतरपैशांची मागणी केली असता, त्याने पैसे परत देण्यास असमर्थता दर्शवली. उलट पैसे मागितल्यास आत्महत्या करण्याची धमकी देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पोलिसांनी आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी अनुप्रिता शिंदे यांनी केली.—
Post Views: 8