सोलापूर -अज्ञात कारणावरून एका 19 वर्षीय युवतीने शेतातील घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मद्रे (ता. दक्षिण सोलापूर) येथे शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
आयेशा कलमोद्यीन नदाफ (वय 19 वर्ष, रा. मद्रे ,पोस्ट कुमठे, ता.दक्षिण सोलापूर) असे मयत झालेल्या तरुणीचे नाव आहे. शनिवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास तिचा मृतदेह शेतातील घरात छताच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तिला फासातून सोडवून वडील कलमोद्यीन यांनी येथील शासकीय रुग्णालयात सकाळी दहा वाजता दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
Post Views: 6