सोलापूर : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर सोलापूर मंगळवेढा रोडवरील एका लॉज मध्ये नेऊन लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी एका तरुणाविरुद्ध सलगर वस्ती पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदित्य विजयकुमार कापुरे (रा. आमराई, देगाव नाका, सोलापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून याबाबत खुद्द पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे.
यातील आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून यातील पीडित तरुणीला 24 मार्च 2026 ते आज तागायत सोलापूर – मंगळवेढा रोडवरील लॉज मध्ये नेऊन तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक खामकर या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
Post Views: 332