सोलापूर – अज्ञात कारणावरून एका 22 वर्षीय विवाहितेने अंगणात सडा मारण्याचे पिवळे विषारी रंग पिऊन माहेरच्या घरी आत्महत्या केल्याची घटना अक्कलकोट रोड एमआयडीसी भागातील सिद्धरामेश्वर नगरात आज बुधवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
रेणुका शिवानंद हेळकर (वय 22 रा.मंद्रूप ता. दक्षिण सोलापूर. सध्या रा.सिद्धरामेश्वर नगर, एमआयडीसी,सोलापूर) असे मयत झालेल्या विवाहितेचे नाव आहे. ती कांही दिवसापूर्वी मंद्रूप येथून सोलापूरला माहेरी राहण्यात आली होती.बुधवारी सकाळच्या सुमारास तिने घरातील बाथरूम मध्ये जाऊन अज्ञात कारणावरून अंगणात सडा मारण्याचे पिवळे विषारी रंग प्राशन केले. हा प्रकार समजल्यानंतर आई जगदेवी यांनी तिला बेशुद्ध अवस्थेत शासकीय रुग्णालयात सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
Post Views: 5