बार्शी – शहरात ऐनापूर मारुती मंदिर परिसरात एका २८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रसाद दत्तात्रय पवार (वय २८, रा. आदर्शनगर, साई मंदिराजवळ, गाडेगाव रोड, बार्शी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
पोलिसांच्या नोंदीनुसार, ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजण्यापूर्वी ऐनापूर मारुती मंदिराजवळील ‘जोशी एंटरप्रायजेस’ या पशुखाद्य विक्रीच्या दुकानात ही घटना घडली. प्रसाद पवार हा या दुकानात कामगार म्हणून कार्यरत होता.
दुकानाच्या वरील बाजूस असलेल्या लोखंडी हुकाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत प्रसाद पवार आढळून आल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या प्रकरणी सुरेश जयनारायण जोशी (वय ६२, रा. वाणी प्लॉट, बार्शी) यांनी पोलिसांना खबर दिली. त्यानंतर बार्शी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक ४८/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे.
मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रमोद केकान पुढील तपास करत आहेत.
Post Views: 5