बार्शी – तालुक्यातील खडकलगावमध्ये भगवंत ब्लड बँकेच्या माध्यमातून झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये ५१ युवा रक्तदात्यांनी सहभाग घेत आपल्या सामाजिक बांधिलकीची प्रचिती दिली. खडकलगावातील युवा सामाजिक कार्यकर्ते सतीश व नितेश धस यांनी आपल्या मातोश्री स्व. कुसुम पंडित धस यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त गरजू रुग्णांना जीवनदान देणाऱ्या रक्तदानासारख्या सेवाभावी उपक्रमाचे आयोजन करत अभिनव आदरांजली वाहिली. गावातील सर्वच ग्रामस्थांनी आणि ५१ रक्तदात्यांनी यांची सत्कार्यातून आपल्या मातेच्या स्मृतीला आदरांजली वाहण्याची उदात्त भावना ओळखली व या कार्यात उत्स्फूर्त सहभाग दिला.
भगवंत ब्लड बँकेने राज्यात अद्वितीय असा निर्णय घेत बिनविरोध ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील सर्व गरजू रुग्णांना आवश्यकतेनुसार मोफत रक्त देण्याचा निर्णय जाहीर केला होता. खडकलगाव हे बिनविरोध ग्रामपंचायत असून या गावचे लोकप्रिय युवा सरपंच स्वप्निल रोंगे यांनी या रक्तदान शिबिरास सदिच्छा भेट देऊन संयोजकांचे कौतुक करत या कार्यास शुभेच्छा दिल्या. खडकगाव सारख्या छोट्याशा गावात हे शिबिर घडवून आणण्यासाठी नुकतेच आदर्श पुरस्काराने सन्मानित गजेंद्र रोंगे पाटील यांच्यासह पंडित धस, वसंत धस, संतोष धस, शरद धस, वैजनाथ धस, राजेंद्र धस, विजय धस, अनिल धस, निलेश रोंगे, ओम धस,अभिषेक धस,अभिजीत धस,श्रीराम धस,किरण माने आदींनी परिश्रम घेतले.
Post Views: 8