बार्शी – सुयश विद्यालय, बार्शी येथे भारतीय स्वातंत्र्याचा ८० वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून संस्थेच्या मार्गदर्शिका सौ. प्रतिभा नलवडे तसेच पत्रकार लाखे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध मार्चपास करुन मान्यवरांना वंदना दिली.
स्वातंत्र्य दिनाच्यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर कार्यक्रमांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी स्केटिंगचे कौशल्यपूर्ण व आकर्षक प्रात्यक्षिक सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळवली. विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीते सादर केली, तर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर सुंदर नृत्य सादर करुन वातावरण भारावून टाकले. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून देशाविषयीचे प्रेम व अभिमान व्यक्त केला.
याप्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती जगताप मॅडम व उपमुख्याध्यापक येवले सर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रमपूर्वक सहकार्य केले. संपूर्ण कार्यक्रम देशभक्ती, उत्साह आणि राष्ट्रप्रेमाच्या वातावरणात संपन्न झाला.
Post Views: 4