बार्शी – लायन्स क्लब बार्शी रॉयलकडून दिलीप सोपल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तावडी ता. बार्शी येथे स्वातंत्र्य दिवस व ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला, लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. मंगेश बागुल यांना शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार पुजारी सर व त्यांच्या शिक्षक वृंदांनी निमंत्रित केले होते. ला. मंगेश बागुल यांनी ध्वजारोहण करुन देशाला स्वातंत्र्य कसे मिळाले याच्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. पर्यावरणाचे व पाण्याची बचत, लाईटची बचत व भविष्यात आपण भारताचे नागरिक म्हणून काय जबाबदारी पार पडणार याचे पण अनुभूती करुन दिली. सोशल मीडियाचा वापर किती करावा व कशासाठी करावा याचे पण त्यांनी जबाबदारी समजावून सांगितले. त्याचबरोबर क्लबमार्फत विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी पण करु व स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पीडीजी जितेंद्र दोशी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या व लायन्स क्लबच्या सामाजिक कार्याबाबत माहिती दिली. या ध्वजारोहणासाठी गावातील ज्येष्ठ नागरिक, माजी सरपंच, माजी विद्यार्थी, पालक, शाळेतील शिक्षक तसेच लायन क्लबचे पदाधिकारी ला. जितेंद्र दोशी, ला. सुनील पाटील, ला. गणेश भंडारी, ला. राजेश खाडे, ला. मनीष उगले, ला. डॉ. तेजस लाड उपस्थित होते.