मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली आहे. मुसळधार पावसामुळे येथे एक चार्टर्ड विमान धावपट्टीवरून घसरल्याचे वृत्त आहे. या विमानात 6 प्रवासी आणि 2 क्रू मेंबर होते.डिजिसीएने दिलेल्या माहितीनुसार, VSR Ventures Learjet 45 विमान VT-DBL विशाखापट्टणमहून मुंबईला उड्डाण करत मुंबई विमानतळावर धावपट्टी 27 वर लँडिंग करताना धावपट्टीवर कोसळलं.


