एप्रिल २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीचा बिगूल वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आमदार प्रणिती शिंदेंना मैदानात उतरविण्याची तयारी केली आहे. मोदी सरकारविरोधात रोखठोक बोलणाऱ्या आणि स्वत:ची कोणतीही संस्था ना कारखाना, त्यामुळे भ्रष्टाचाराच्या आरोपात बदनाम न झालेला स्वच्छ चेहरा म्हणून जनमत त्यांच्यासोब येईल असा पक्षाला विश्वास आहे. अशावेळी भाजपने मात्र सावध भूमिका घेत सोलापूर लोकसभेचा पुढचा उमेदवार कोण? याचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. माढ्यातही अशीच स्थिती असून त्याठिकाणी भाजपकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना पुन्हा उमेदवारी मिळणार का? राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोण निवडणूक लढविणार याबद्दलही उत्सुकता आहे.सोलापूर व माढा हे जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघ मोदी लाटेत भाजपच्या ताब्यात गेले. विशेष बाब म्हणजे सोलापूर लोकसभेतून दोन्हीवेळी काँग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना मिळालेली मते १९९९च्या निवडणुकीपेक्षा वाढलेली असतानाही त्यांचा पराभव झाला. १९९९च्या निवडणुकीत श्री. शिंदे यांना दोन लाख ८६ हजार ५७८ मते मिळाली होती आणि या निवडणुकीत त्यांनी भाजपचे लिंगराज वल्याळ (दोन लाख ९ हजार ५८३ मते) यांचा पराभव केला होता. त्यानंतर २००४च्या पोटनिवडणुकीत प्रतापसिंह मोहिते-पाटील आणि त्यानंतर सुभाष देशमुख या मतदारसंघातून खासदार झाले.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...