भंडारा जिल्ह्यात कालपासून पावसाने चांगलाच झोडपून काढल आहे. आज सकाळपासून देखील पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली आहे. तर, तुमसर तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस बरसला आहे. मध्य प्रदेशकडून तुमसर कडे येत असलेल्या चालत्या चारचाकी वाहनावर झाड कोसळले आहे.
या वाहनात चार जण बसले होते. पण सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. सर्व चारही जणांना किरकोळ इजा झाली असल्याने त्यांना सिहोरा येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर, गाडीचा समोरिल काच व वरिल भाग तुटून पडला आहे.