उत्तरप्रदेशच्या मथुरा येथे ईएमयू रेल्वे प्लॅटफॉर्मवर चढल्याची घटना घडली. हा अपघात मंगळवारी रात्री घडला. सुदैवाने गाडीत प्रवासी नसल्यामुळे कुठलीही जीवित हानी झालेली नाही.
यासंदर्भातील माहितीनुसार एक ईएमयू रेल्वे ही शकूर बस्तीकडून येत होती. ही गाडी मथुरा रेल्वे स्थानकात येतांना अचानक रूळ सोडून थेट प्लॅटफॉर्मवर चढली. अचानक गाडी प्लॅटफॉर्मवर आल्याने नागरिक घाबरून पळाले. एकच गोंधळ उडल्याने रेल्वे पोलिस घटनास्थळी आले. या रेल्वेतून आधीच प्रवासी उतरले होते. त्यामुळे जीवित हानी टळली. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत माहिती मिळू शकली नाही. हा अपघात मंगळवारी रात्री 10.49 वाजता झाला. ही गाडी जेव्हा मथुरा स्टेशनवर आली तेव्हा गाडीतील प्रवासी उतरले. यानंतर रेल्वे पुन्हा सुरू झाली अन् थेट प्लॅटफॉर्मवर चढली. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. यात रेल्वेच इंजिन हे प्लॅटफॉर्मवर आल्याचे दिसत आहे. यामुळे सीमेंटचा प्लॅटफॉर्म देखील तुटला आहे.सध्या अपघातग्रस्त रेल्वे ही प्लॅटफॉर्मवरुन काढण्याचे काम सुरू आहे. अपघातामुळे प्लॅटफॉर्म आणि वरील शेडचे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे अप मार्गावरील रेल्वे वाहतूक ही विस्कळीत झाली आहे. गाडी हटवल्यावर येथील रेल्वे वाहतूक ही पुन्हा सुरळीत केली जाणार आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...