हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट नुकताच सेन्सॉर बोर्डाकडे पाठवण्यात आला. पठाण चित्रपटातील गाणं आणि चित्रपटाचा काही भाग बदलण्याची सूचना सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी फिल्ममेकर्सला दिली आहे. संबंधित बदल करुन सेन्सॉर बोर्ड समोर हा चित्रपट सादर करावा, असं प्रसून जोशी यांनी सांगितलं आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं. हा चित्रपट नुकताच सीबीएफसी समितीकडे प्रमाणपत्रासाठी पोहोचला. CBFC मार्गदर्शक तत्त्वांनुसार चित्रपट परीक्षण प्रक्रियेतून गेला. समितीने निर्मात्यांना गाण्यांसह चित्रपटात सुचवलेले बदल अंमलात आणण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच थिएटरमध्ये रिलीज होण्यापूर्वी चित्रपटाची सुधारित आवृत्ती सादर करण्याचे मार्गदर्शन देखील समितीनं केले आहे.
CBFC नेहमीच सर्जनशील अभिव्यक्ती आणि प्रेक्षकांची संवेदनशीलता यांच्यातील योग्य संतुलन राखण्यासाठी वचनबद्ध आहे. आपली संस्कृती आणि श्रद्धा यांचा विचार प्रत्येकानं करावा आणि सावधगिरी बाळगावी. निर्माते आणि प्रेक्षक यांच्यातील विश्वास महत्वाचा आहे. निर्मात्यांनी त्या दिशेने कार्य करत राहिले पाहिजे.काही दिवसांपूर्वी पठाण चित्रपटातील बेशरम रंग हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले. हे गाणं वादाच्या भोवऱ्यात अडकले. बेशरम रंग या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोणनं घातलेल्या बिकीनीच्या रंगावर काही लोकांनी आक्षेप घेतला होता.