मी हिंदूंचं जे धर्मांतरण करण्याचं एक प्रकार षडयंत्र महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यामध्ये चालू आहे या विषयांमध्ये लक्षवेधी लावली होती त्यानंतर तिथल्या PIची तात्काळ बदली माननीय मंत्री महोदयांनी केली आणि त्यानंतर वाळू वाले, मटकेवाले, दारूवाले यांना हाताला धरून त्या PI सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. कुठे आत्महत्येचा स्टंट केला कुठे त्या ठिकाणी मोर्चा काढण्याचा केविलवाना प्रयत्न केला आणि त्यानंतर नगर जिल्ह्यातून मला धमक्या आलेल्या आहेत की नगर जिल्ह्यात पाऊल ठेवून दाखवा पीआय दराडे ला अशा पद्धतीने कसं काय बोललात अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या धमकी आणि ज्यांनी धमक्या दिल्या या सगळ्या लोकांचा क्रिमिनल रेकॉर्ड आहे म्हणून या विषयांमध्ये मी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आज सभागृहामध्ये माननीय गृहमंत्री देवेंद्रजी फडवणीस साहेब यांच्याकडे मागणी केली की ज्यांनी कुणी मला धमक्या दिलेल्या आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि पीआय दराडे हे ख्रिश्चन मिशनरींना मागे टाकतायेत त्या पीआय दराडे बदली करून चालणार नाही तर तात्काळ त्यांचं निलंबन झालं पाहिजे ही माझी मागणी होती. सभागृहाने याची गंभीर दखल घेतलेली आहे आणि PI दराडे चौकशीनंतर 100% त्या निलंबन होईल आम्हाला विश्वास आहे असे हि राम सातपुते म्हणाले.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...