Monday, February 9, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पाकिस्तानला गोपनीय माहिती देणाऱ्याला अटक

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
October 31, 2023
in india
0
पाकिस्तानला गोपनीय माहिती देणाऱ्याला अटक
0
SHARES
59
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पाकिस्तानची गुप्तचर संघटना इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सला (आयएसआय) देशाची गोपनीय माहिती पाठवणाऱ्या तरुणाला राजस्थान पोलिसांनी अटक केलीय. नरेंद्र कुमार असे आरोपी तरुणाचे नाव आहे. तो गेल्या 2 वर्षांपासून पाकिस्तानी महिला गुप्तहेरांच्या संपर्कात होता. हनीट्रॅपमध्ये अडकून त्याने देशातील संवेदनशील माहिती शत्रुला दिल्याचा आरोप आहे.

याबाबत राजस्थानचे अतिरिक्त पोलिस महासंचालक एस सेनगाथिर यांनी सांगितले की, गुप्तचर शाखा सतत सीमावर्ती भागात आयएसआयच्या कारवायांवर लक्ष ठेवते. सततच्या निरिक्षणानंतर, असे लक्षात आले की नरेंद्र कुमार (22) हा सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या 2 महिला एजंट्सच्या सतत संपर्कात आहे. त्यांच्याकडून त्याला करण्यात आल्याचे एस सेनगाथिर यांनी सांगितले. व्यवसायाने बाईक मेकॅनिक आणि भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेजवळ असलेल्या बिकानेरमधील आनंदगढ खाजुवाला येथील रहिवासी असलेल्या कुमारला पोलिसांनी तात्काळ जयपूर येथील संयुक्त चौकशी केंद्रात आणण्यात आले. चौकशीदरम्यान, त्याने उघड केले की तो सुमारे 2 वर्षांपूर्वी “पूनम बाजवा” आणि “सुनीता” नावाच्या महिलांच्या फेसबुकद्वारे संपर्कात आला होता.

नरेंद्र कुमारला पूनमने ती, पंजाबमधील भटिंडा येथील रहिवासी असून, ती बीएसएफमध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करत असल्याचे सांगितले होते. अतिरिक्त पोलिस महासंचालक एस सेनगाथिर यांनी सांगितले की, पूनमने कुमारशी मैत्री केली आणि त्याच्याशी लग्न करण्याचे आश्वासन देऊन त्याला सीमावर्ती भागाबद्दल संवेदनशील माहिती गोळा करण्यास सांगितले.

त्यानंतर पूनमने नरेंद्रला एक व्हॉट्सअॅप नंबर दिला आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील भारतीय भूभागाची संवेदनशील माहिती जसे की रस्ते, पूल, बीएसएफ पोस्ट, टॉवर, लष्कराच्या वाहनांचे फोटो आणि प्रतिबंधित ठिकाणांचे फोटो/व्हिडीओ मागितले, जे त्याने वेळोवेळी तिला पाठवले.

दुसरी महिला सुनीता हिने एका राष्ट्रीय वृत्तपत्राची स्थानिक पत्रकार असल्याचे सांगून नरेंद्र कुमारशी मैत्री केली. नरेंद्रने तिच्यासोबत संवेदनशील माहिती शेअर करावी अशी तिची मागणी होती. नरेंद्र कुमारने अशी माहिती सुनितासोबत शेअर केल्याचे कबूल केले, असे सेनगाथिर म्हणाले. नरेंद्र कुमारच्या मोबाइल फोनची तांत्रिक तपासणी केल्यानंतर, त्याच्यावर तात्काळ ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्ट, 1923 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली.

Post Views: 139
Previous Post

मुकेश अंबानींना तिसऱ्यांदा धमकीचा ईमेल

Next Post

चंद्रबाबू नायडूंना अंतरिम जामीन मंजूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
चंद्रबाबू नायडूंना अंतरिम जामीन मंजूर

चंद्रबाबू नायडूंना अंतरिम जामीन मंजूर

ताज्या बातम्या

शरद पवारांची प्रकृती बिघडली…#public #marathinews #solapurnews #viral #maharashtranews #livenews

February 9, 2026

सुयशच्या विद्यार्थ्यांनी घेतले शौर्य चरित्र निर्माण अनुशासनचे धडे.#public #marathinews #viral #news

February 9, 2026

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी मध्ये भाजपचा विजय झाल्यानंतर दुचाकी गल्लीत फिरवत कार्यकर्ते जल्लोष.#viral

February 9, 2026

उमेश पाटलांचे बंधू संतोष पाटील यांचा मोहोळच्या नरखेड जिल्हा परिषद गटातून पराभव लखन शिंदे नरखेड विजय.

February 9, 2026

धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील एका निकालाने राज्यभरात खळबळ उडवली आहे.

February 9, 2026

संस्कृती सातपुते या विजयी जल्लोष साजरा करत प्रसार माध्यमांशी संवाद साधला राम सातपुते..#public

February 9, 2026

उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ गटातून भाजपचे इंद्रजीत पवार यांचा विजय झाल्यानंतर जल्लोष#viral

February 9, 2026

उमेश पाटलांचे बंधू संतोष पाटील यांचा मोहोळच्या नरखेड जिल्हा परिषद गटातून पराभव झाला आहे#public

February 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0669330

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697