Thursday, February 12, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नवाब मलिकांबाबत दादा गटाची ठोस भूमिका नाहीच, फडणवीसांच्या लेटरबाँम्बने अजित पवार गट कात्रीत

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
December 9, 2023
in political
0
नवाब मलिकांबाबत दादा गटाची ठोस भूमिका नाहीच, फडणवीसांच्या लेटरबाँम्बने अजित पवार गट कात्रीत
0
SHARES
54
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आर्थिक गैरव्यवहार आणि देशद्रोह्यांशी संबंधित असल्याच्या आरोपाप्रकरणी जामिनावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नबाव मलिक यांच्या महायुती सरकारमधील सहभागावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला होता. त्यामुळे अजित पवार गटाची कोंडी झाल्याने दादा गट बॅकफूटवर गेला आहे.

 

 

आर्थिक गैरव्यवहार आणि देशद्रोह्यांशी संबंधित असल्याच्या आरोपाप्रकरणी जामिनावर सुटका झालेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे समर्थक आमदार नवाब मलिक यांच्याबाबत पक्षाला शुक्रवारी दिवसभरात ठोस भूमिका मांडता आलेली नाही. मलिक यांना महायुतीत सहभागी करून घेण्यास गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडाडून विरोध केला होता. त्यामुळे ऐन विधिमंडळ अधिवेशनामध्ये अजित पवार गटाची कोंडी झाली असून हा गट काहीसा बॅकफूटवर गेल्याचे पाहायला मिळाले.

 

 

नवाब मलिक यांनी जवळपास २२ महिन्यांनंतर विधानसभेमध्ये पाऊल ठेवताना सत्ताधारी बाके निवडली. त्यामुळे विरोधी पक्षांनी देवेंद्र फडणवीस यांना घेरण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी गुरुवारी अजित पवार यांना पत्र लिहिले. ‘सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. मलिक यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र, अशा प्रकारचे आरोप असताना मलिक यांना महायुतीचा भाग करणे योग्य होणार नाही’, अशा शब्दांत फडणवीस यांनी अजित पवार गटाचे कान टोचले.

 

 

फडणवीस यांच्या या पत्रानंतर नवाब मलिक यांच्यासंदर्भात नेमकी काय भूमिका घ्यावी, याबाबत अजित पवार गटात शुक्रवारी दिवसभर संभ्रम होता. त्यामुळे नवाब मलिकप्रश्नी भाजपने घेतलेल्या भूमिकेला राष्ट्रवादीकडून स्पष्ट उत्तर देण्यात आले नाही. यासंदर्भात अजित पवार यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारले असता, ‘देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेले पत्र मिळाले आणि मी ते वाचले आहे. आम्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने २ जुलैला महायुतीसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो. बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्यानंतर मलिक गुरुवारी पहिल्यांदा सभागृहात आले. यासंदर्भात नवाब मलिक यांनी स्वत:ची भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आम्ही पक्षाची भूमिका मांडू. त्यामुळे त्यांचे मत आम्हाला स्पष्टपणे कळू द्या’, असे पवार यांनी सांगितले. अजित पवार यांच्या या सौम्य उत्तरामुळे त्यांचा गट बॅकफूटवर गेल्याचे पाहायला मिळाला.

 

 

पत्रामुळे राष्ट्रवादीची नाराजी

फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या बाबतीत समाजमाध्यमावर प्रसारित केलेल्या पत्राची अजित पवार गटाच्या आमदारांना कल्पना नव्हती. त्यामुळे पवार गटात नाराजी असल्याचे पाहायला मिळते. ‘नवाब मलिक यांच्याबाबत अजित पवार किंवा अन्य नेत्यांशी बोलून वाद टाळता आला असता. शिवाय ते सभागृहात आल्यानंतर त्यांना बसण्यासाठी कुठे जागा द्यायची, याबाबत चर्चा करून निर्णय घ्यायला हवा होता’, असे मत अजित पवार गटाच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने व्यक्त केले.

Post Views: 86
Previous Post

गुन्हे मागे न घेतल्यास २४ तारखेनंतर मराठा समाज काय असतो ते दाखवून देऊ : मनोज जरांगे पाटील

Next Post

फडणवीसांच्या पत्रानंतर रोखठोक बोलणारे अजितदादा अडखळले, रोहित पवार हळहळले, म्हणाले….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
फडणवीसांच्या पत्रानंतर रोखठोक बोलणारे अजितदादा अडखळले, रोहित पवार हळहळले, म्हणाले….

फडणवीसांच्या पत्रानंतर रोखठोक बोलणारे अजितदादा अडखळले, रोहित पवार हळहळले, म्हणाले....

ताज्या बातम्या

देशव्यापी कामगार संघटनांच्या संपात गर्जले कामगार नेते…

February 12, 2026

सोलापूर झेडपी राज्यात नंबर 1 #public #solapurnews #marathinews #viral

February 12, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली पंतप्रधानांची भेट.#public

February 12, 2026

थंबनेल छत्रपतींच्या पुतळ्याचे सुशोभीकरण पुन्हा करा -#viral #solapurnews #viral #शिवजयंती

February 12, 2026

जरांगेंचे सोलापुरात जंगी स्वागत..#mh13newssolapur #marathinews #viral

February 12, 2026

सोलापूर झेडपी राज्यात नंबर १..#mh13

February 12, 2026

भाजपच्या नूतन जिल्हा परिषद सदस्यांचा बुधवारी मोठ्या प्रमाणावर सत्कार सोहळा साजरा.#bjp

February 12, 2026

मी मराठ्यांच्या गरीब लेकरांना मोठं करतो.#viral #public #manojjarange

February 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0676782

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697