Thursday, August 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

लोकसभा निवडणुकीआधी मोदी सरकारचा मास्टरप्लान, सीएए कायद्याबाबत महत्त्वाचा निर्णय होणार?

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 3, 2024
in india
0
लोकसभा निवडणुकीआधी मोदी सरकारचा मास्टरप्लान, सीएए कायद्याबाबत महत्त्वाचा निर्णय होणार?
0
SHARES
105
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

देशातील नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी लोकसभा निवडणुकीपूर्वीच केली जाईल अशी माहिती वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

 

देशातील नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची (सीएए) लोकसभा निवडणुकीपूर्वीच अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून मंगळवारी देण्यात आली. मुस्लिमेतर नागरिकांना भारतीय नागरिकत्व बहाल करणारा महत्त्वाकांक्षी कायदा केंद्र सरकारने आणला असून, त्याच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा आहे.

 

 

सीएए’अन्वये ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आलेल्या बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात येणार आहे. डिसेंबर २०१९मध्ये संसदेमध्ये हे विधेयक मंजूर करण्यात आला होते. त्यानंतर तातडीने राष्ट्रपतींनी त्यास मंजुरी दिली होती. या कायद्याच्या मसुद्यावरून विरोधकांनी संताप व्यक्त केला होता, तर देशाच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शनेही करण्यात आली होती. ‘आम्ही लवकरच सीएएची नियमावली जारी करणार असून त्यानंतर कायद्याची अंमलबजावणी होऊ शकते. त्यातून पात्र नागरिकांना भारतीय नागरिकत्व देता येईल,’ अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. या कायद्याच्या अंमलबजावणीला चार वर्षांहून अधिक काळ विलंब झाला असल्याने आता तातडीने तो लागू होणे गरजेचे आहे, असे मतही व्यक्त करण्यात आले. एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच याबाबत अधिसूचना जारी करण्यात येणार आहे, असेही नमूद करण्यात आले. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नियमावली तयार करण्यात आली असून, ऑनलाइन पोर्टलही सुरू करण्यात येत आहे. नागरिकत्वाबाबतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. अर्जदारांना प्रवासी कागदपत्रांशिवाय भारतात प्रवेश केल्याचे वर्ष घोषित करावे लागेल. त्यांच्याकडून कोणतेही दस्तावेज मागवले जाणार नाहीत, असे सांगण्यात आले.

 

 

भाजपसाठी महत्त्वाकांक्षी कायदा

‘सीएएची अंमलबजावणी करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. हा येथील भूमीचा कायदा आहे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या मुद्द्यावर नागरिकांची दिशाभूल केली आहे,’ असा आरोप २७ डिसेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला होता. पश्चिम बंगालमध्ये गेल्या लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये ‘सीएए’ची अंमलबजावणी हे प्रमुख वचन भाजपने दिले होते. संसदीय कार्यपद्धतीच्या नियमावलीनुसार, कोणत्याही कायद्याचे नियम राष्ट्रपतींच्या संमतीनंतर सहा महिन्यांच्या आत तयार होणे आवश्यकता असतात किंवा लोकसभा, राज्यसभेतील कायदेविषयक समित्यांकडून मुदतवाढ मागितलेली असणे आवश्यक असते. २०२०पासून गृहमंत्रालय नियम तयार करण्यासाठी संसदीय समित्यांकडून नियमित अंतराने मुदतवाढ घेत आहे.

 

नवीन कायदे २६ जानेवारीपूर्वी

नवी दिल्ली : नव्याने मंजूर करण्यात आलेले फौजदारी कायदे लागू करण्याची अधिसूचना २६ जानेवारीपूर्वी जारी करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. या कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी पोलिस अधिकारी, तपास यंत्रणा आणि न्यायवैद्यक संस्थांतील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ब्रिटिश काळापासून असलेले भारतीय न्यायसंहिता, फौजदारी दंडसंहिता आणि साक्षीदार कायद्यांऐवजी भारतीय न्यायसंहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम असे तीन कायदे संसदेने मंजूर केले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी २५ डिसेंबर रोजी या तिन्ही विधेयकांवर सह्या केल्या आहेत. या कायद्यांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी व्हावी, वेगात व पुराव्यांवर आधारित तपास व्हावा, खटल्यांसाठीचा वेळही कमी व्हावा, यासाठी पोलिसांना प्रशिक्षण देण्याचा हेतू आहे. या प्रशिक्षणासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांतील तीन हजार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वर्षभरात ९० टक्के अपेक्षित अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न आहे, असेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. न्यायसंस्थेतील प्रशिक्षणासाठी केंद्रीय गृहमंत्रालय चर्चा करत असून, भोपाळ येथील अकादमीमध्ये हे प्रशिक्षण होईल.

Post Views: 90
Previous Post

पेट्रोल मिळणार नसल्याची अफवा, घाईघाईने पेट्रोल पंपाकडे जाताना अनर्थ, बाईकचा ताबा सुटला अन्…

Next Post

तिसऱ्या क्रमांकावर येण्यासाठी फक्त १ चेंडू लागतो… अपयशी ठरत असलेल्या गिलबद्दल कर्णधार रोहितचे मोठे वक्तव्य

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
तिसऱ्या क्रमांकावर येण्यासाठी फक्त १ चेंडू लागतो… अपयशी ठरत असलेल्या गिलबद्दल कर्णधार रोहितचे मोठे वक्तव्य

तिसऱ्या क्रमांकावर येण्यासाठी फक्त १ चेंडू लागतो... अपयशी ठरत असलेल्या गिलबद्दल कर्णधार रोहितचे मोठे वक्तव्य

ताज्या बातम्या

मेटाच्या टीमने मागितली केंद्र सरकारची माफी #viral #news #marathinews

August 6, 2026

सोलापूर तरुण भारत Short Updates 11

August 5, 2026
नेताजी शिक्षण संकुलास क्रीडा उपसंचालक नाईक यांची सदिच्छा भेट

नेताजी शिक्षण संकुलास क्रीडा उपसंचालक नाईक यांची सदिच्छा भेट

August 5, 2026
तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत श्री शंकरलिंग प्रशालेस घवघवीत यश 

तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत श्री शंकरलिंग प्रशालेस घवघवीत यश 

August 5, 2026

शहीद पोचिराम  कांबळे यांच्या स्मृतीदिन निमित्य वही वाटप

August 5, 2026
आषाढ महिन्यानिमित्त श्री मरीमातेची गाव जत्रा भक्तिमय वातावरणात सागरी

आषाढ महिन्यानिमित्त श्री मरीमातेची गाव जत्रा भक्तिमय वातावरणात सागरी

August 5, 2026
पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेतील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना तातडीने बक्षीस रक्कम द्या

पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेतील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना तातडीने बक्षीस रक्कम द्या

August 5, 2026
हॉटेल असोसिएशन बार्शीच्यावतीने नूतन आमदार राजेंद्र राऊत यांचा सत्कार

हॉटेल असोसिएशन बार्शीच्यावतीने नूतन आमदार राजेंद्र राऊत यांचा सत्कार

August 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1030367

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!