सोलापूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून निघून गेलेल्या एका १४ वर्षीय चिमुकल्याचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला आला आहे. विशाल विजय बट्टू वय १४ रा. घोंगडे वस्ती असे मयत झालेल्या चिमुकल्यांचे नाव आहे.विशाल बट्टू यांचा मृतदेह तुळजापूर रोडवरील सर्व्हिस रोडवर मिळून आला आहे. घटनास्थळी जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी दाखल झाले असून अधिक तपास पोलीस करत आहे. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. अधिक तपास जोडभावी पेठ पोलीस करत आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

















