Tuesday, July 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या आज दुपारी दीड वाजता ‘अक्षता सोहळा’ संपन्न झाला.

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 14, 2024
in solapur
0
शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या आज दुपारी दीड वाजता ‘अक्षता सोहळा’ संपन्न झाला.
0
SHARES
72
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी, रविवारी दुपारी सिद्धेश्वर मंदिर तलावाच्या काठी संमती कट्टय़ावर लाखो भाविकांच्या साक्षीने पारंपरिक पद्धतीने ‘अक्षता सोहळा’ संपन्न झाला. या सोहळ्यास राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाराबंदी या पारंपारिक पोशाखात विशेष उपस्थिती लावली. अक्षता सोहळा पार पडताच ‘हर बोला हर, सिद्धेश्वर महाराज की जय’च्या जय घोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. अक्षता सोहळ्यासाठी खासदार डॅा. जयसिद्धेश्वर महास्वामी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, त्यांच्या कन्या प्रीती श्रॉफ, अक्कलकोट नरेश मालोजी राजे भोसले , मानकरी तथा आमदार विजयकुमार देशमुख, लोकप्रिय आमदार रोहित पवार, आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलिस आयुक्त राजेंद्र माने, महापालिका आयुक्त शीतल तेली – उगले, माजी खासदार अमर साबळे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, माजी आमदार दिलीप माने, विश्वनाथ चाकोते, शिवशरण पाटील, श्रीसिद्धेश्‍वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, विश्‍वस्त ॲड. मिलिंद थोबडे, मोहन डांगरे आदि उपस्थित होते. या मुख्य सोहळ्यास महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा येथून लाखो भाविक दाखल झाले होते.

 

 

” शिवयोगी सिद्धेश्‍वर महाराज की जय’ या जयघोषात रविवारी दुपारी ठीक दीड वाजता सत्यम सत्यम… दिड्डम… दिड्डमचा उच्चार झाला अन्‌ चारही बाजूंनी अक्षतांचा वर्षाव झाला. शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रविवारी श्रीसिद्धेश्वर मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावर योगदंडाबरोबर अक्षता सोहळा संपन्न झाला. भक्तिमय वातावरणात झालेल्या या सोहळ्यास भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सोलापुरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज यात्रेतील पारंपरिक अक्षता सोहळा भक्ती भावात पार पडला. श्री सिद्धरामेश्वर यांच्या योगदंडाशी कुंभार कन्येचा विवाह सोहळा पार पडला. संमती कट्याजवळ गंगा पूजन व सुगडी पूजन झाले. मानकरी कुंभार यांच्याकडून दिलेल्या सुगडीचे हिरेहब्बू व देशमुख यांच्या हस्ते पूजन केले. सत्यम सत्यम म्हणताच भाविकांनी अक्षता टाकल्या. दरम्यान अक्षता सोहळा पार पडल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री सिध्देश्वर महाराज यांचे दर्शन घेतले. त्यानंतर देवस्थान समितीच्या वतीने पालकमंत्री यांचा श्री सिद्धेश्वर यांची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले.

 

 

यात्रा समितीचे प्रमुख महादेव चकोते यांनी यात्रा यशस्वी होण्यासाठी पालकमंत्री व जिल्हा प्रशासन देत असलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा ही सत्कार करण्यात आला. दरम्यान आपले मनोगत व्यक्त करताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूरवासियांना शुभेच्छा दिल्या. तदनंतर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त करताना यात्रेच्या शुभेच्छा देत सर्वधर्मसमभाव टिकून राहावा असे आवाहन यावेळी केले. या अक्षता सोहळ्यासाठी बाराबंदी या पोशाखात विशेष आवर्जून उपस्थित राहिलेले लोकप्रिय आमदार रोहित पवार यांनी देखील हा सोहळा पाहून आनंदमय सोहळ्याचे कौतुक केले आणि सर्वांनी एकत्रित येत आपला धर्म संस्कार पाळावेत असे सांगितले. याप्रसंगी सोलापूरसह आंध्र कर्नाटक तेलंगणा या राज्यातील देखील भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंदिर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठीक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Post Views: 127
Previous Post

भुजबळांची चौकशी करा, काही झालं तर देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील | मनोज जरांगे

Next Post

मिलिंद देवरा शिंदेंच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर पहिली प्रतिक्रिया

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मिलिंद देवरा शिंदेंच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर पहिली प्रतिक्रिया

मिलिंद देवरा शिंदेंच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर पहिली प्रतिक्रिया

ताज्या बातम्या

वारीसाठी ग्रामीण पोलीस सज्ज #viral #marathinews #solapurnews #maharashtranews #news

July 7, 2026

मोदींच्या प्रेमासाठी तो चढला तिरुपती डोंगरावर #viral #marathinews #solapurnews #news

July 7, 2026

महिलेवर झाडली गोळी #viral #solapurnews #marathinews #news #samarthanews

July 7, 2026

पहा काय म्हणाले मिसिंग लिंक बद्दल मुख्यमंत्री #viral #maharashtranews #marathinews #news

July 7, 2026

मुंडेंनी गुप्त प्लॅनिंगने भेसळ दुधाचे रॅकेट केले उघडे #viral #maharashtranews #marathinews #news

July 7, 2026

मुंबई पुण्यातल्या पावसाचा सोलापूर रेल्वे नियोजनाला फटका #viral #solapurnews #marathinews #aajsolapur

July 7, 2026

सोलापूरच्या श्रेया मानेची लुनार मोहिमेत दमदार कामगिरी #viral #solapurnews #marathinews

July 7, 2026

कुणीही घराबाहेर पडू नका – मुख्यमंत्री #marathinews #maharashtranews #viral

July 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0963147

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!