आपल्या सर्वांना माहिती आहे कि 22 जानेवारीला मोठ्या उत्साहात राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. व या सोहळ्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. मोठ्या संख्येने भाविक राम मंदिरात दाखल होत आहे.
भारतातूनच नाही तर देश-विदेशातून भक्त अयोध्येत जमा झाले आहेत. एवढेच काय तर पहाटेपासून मंदिराबाहेर भक्तांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. भाविक प्रभू रामासमोर नतमस्तक होत असून दानधर्मही मोठ्याप्रमाणात करत आहेत. राम मंदिरात गेल्या 11 दिवसात मोठी देणगी गोळा झाली आहे.
मागील 11 दिवसात किती देणगी?
▪️ 22 जानेवारीला झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापासून गेल्या 11 दिवसांत सुमारे 25 लाख भाविकांनी अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली. तर सुमारे 25 लाख भाविकांनी प्रभू रामाचं दर्शन घेतलं आहे. इतकंच नाही तर गेल्या 11 दिवसांत राम मंदिराला मोठी देणगीही मिळाली आहे.
▪️ राम मंदिराला गेल्या 11 दिवसांत 11 कोटी हुन अधिक रुपयांची देणगी मिळाली आहे. राम मंदिराच्या दानपेटीत 8 कोटी रुपये आणि चेक आणि ऑनलाइन व्यवहारांद्वारे सुमारे 3.5 कोटी रुपये जमा झाले आहेत.