Saturday, May 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

टॉवेलने गळा आवळून आजीला संपवलं, दोन नातवांसह सूनेच्या कृत्याने सांगली हादरली…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 22, 2024
in crime
0
टॉवेलने गळा आवळून आजीला संपवलं, दोन नातवांसह सूनेच्या कृत्याने सांगली हादरली…
0
SHARES
93
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगलीत एका हत्येच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. येथे दोन नातवांसह सूनेने मिळून एका वृद्धेला संपवलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी नातू आणि सूनेला ताब्यात घेतंल आहे.

 

खानापूर तालुक्यातील पारे येथे जमिनीच्या वादातून ८० वर्षीय वृद्धेचा नातवानीच टॉवेलने गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक घटना घडली. ही घटना मंगळवारी घडल्याची माहिती आहे. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास संगीता रामचंद्र साळुंखे यांच्या घरी पारे येथे ही घटना घडली, त्या मृत वृद्धेची मुलगी आहे. श्रीमती सखुबाई संभाजी निकम (वय ८०, रा. चिंचणी मंगरूळ) असे मृत झालेल्या दुर्दैवी वृद्धेचे नाव असून याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून अशिष सतिश निकम आणि रेणुका सतिश निकम (दोघेही रा. चिंचणी मंगरुळ ता. खानापूर, जि. सांगली) या दोघांना विटा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वृद्धेचा सुनेसह दोन नातवांनीच टॉवेलने गळा आवळून तिचा खून केल्याने खानापूर तालुक्यासह परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत विटा पोलिस ठाण्यात संगीता रामचंद्र साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, फिर्यादी संगीता साळुंखे यांचा भाऊ सतिश संभाजी निकम यांनी त्यांची निम्मी प्रॉपर्टी जावई कुणाल पाटील यांच्या नावावर करण्याचं फिर्यादींनी सतिश निकम यांना सांगितलं. याचा राग मनात धरुन अशिष सतिश निकम आणि रेणुका सतिश निकम यांनी संगनमत करुन दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी फिर्यादी संगिता रामचंद्र साळुंखे यांच्या घरी येऊन तुझ्या भावाला ४८ तासाची मुदत देतो, तू भावाला बोलावुन घेऊन सदरची प्रॉपटर्टी फिरवुन दे, नाहीतर तुला आणि म्हतारीला ४८ तासानंतर दाखवितो, अशी धमकी दिली होती. त्यानंतर मंगळवारी (२० फेब्रुवारी २०२४) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास फिर्यादीची आई सखुबाई संभाजी निकमचा प्रॉपर्टीच्या कारणावरुन चिडून जाऊन टॉवेलने गळा आवळून जीवे ठार मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक शरद मेमाणे करीत आहेत.

 

दरम्यान, प्रॉपर्टीच्या कारणावरुन रागाच्या भरात टॉवेलने गळा आवळून वृद्धेचा खून झाल्याची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली. या घटनेची माहिती मिळताच तातडीने विटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शरद मेमाणे हे पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला. तपासाला गती देत विटा पोलिसांनी संशयिताना तातडीने ताब्यात घेतले. खून झालेल्या वृद्धेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी विटा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.

Post Views: 77
Previous Post

सोलापूर जिल्हा परिषदेत रात्रीचा खेळ आता दिवसा चालू लागला…?

Next Post

मुंबईत ठाकरेंचे चार लोकसभा उमेदवार ठरल्याची चर्चा, माजी राज्यसभा सदस्यासह खासदारपुत्राला तिकीट ?

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मुंबईत ठाकरेंचे चार लोकसभा उमेदवार ठरल्याची चर्चा, माजी राज्यसभा सदस्यासह खासदारपुत्राला तिकीट ?

मुंबईत ठाकरेंचे चार लोकसभा उमेदवार ठरल्याची चर्चा, माजी राज्यसभा सदस्यासह खासदारपुत्राला तिकीट ?

ताज्या बातम्या

आता मुलांना मिळणार सर्व लसीकरण #marathinews

May 16, 2026

मनीषा मानेवर दोष निश्चितीला वेळ #solapurnews

May 16, 2026

हडपसर मध्ये बॉम्ब ठेवणारा शिवाजी राठोड सोलापूरचा

May 16, 2026

रोटरीची आशा एक्सप्रेस करणार महिलांच्या मोफत कॅन्सर टेस्ट

May 16, 2026

मुंबई पुणे एक्सप्रेसवर झालेल्या अपघातात संपूर्ण रस्त्यावर रंग विखुरला #viral #marathinews

May 16, 2026

जिल्हापरिषदेच्या सीईओनी केले नो व्हेईकल डे चे आवाहन #solapurnews

May 16, 2026

इस्लापूर येथे जलजीवन मिशनच्या मेन लाईनला गळती #marathinews

May 16, 2026

कळंब येथे बिर्याणी सत्याग्रह अनोखे आंदोलन #marathinews

May 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0867021

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697