टीम इंडियाचा माजी क्रिकेटर सचिन तेंडूलकरची मुलगी सारा तेंडूलकर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावरही ती नेहमी सक्रिय असते. सोशल मीडियावरही ती नेहमी तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. जे अवघ्या काही वेळात व्हायरल होतात.
जरी सारा फिल्म इंडस्ट्रीपासून दूर असली तरी तिचं फॅन फॉलोईंग मात्र जबरदस्त आहे. सारा नेहमी बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना टक्कर देताना दिसते. साराने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती आपल्या लग्नाबाबत बोलताना दिसत आहे.
साराने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने लग्नाबाबत खुलासा केला आहे. व्हिडिओत सारा आपल्या मैत्रिणीसोबत दिसत आहे. साराने या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे की, ती आपल्या मैत्रिणीपेक्षा जास्त पैसे खर्च करते. याचबरोबर ती असंही म्हणाली आहे की, ती तिच्या मैत्रिणीआधी लग्न करणार आहे. हा व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

















