तुळजापूर- श्रीतुळजाभवानी मातेच्या शांकंभरी नवराञोत्सवाचा सांगता शांकंभरी (पौष) पोर्णिमा दिनी शुक्रवार दि ६ रोजी होमकुंडा त कोहळ्याची पुर्णाहुती दिल्या नंतर घटोत्यापन करण्यात येवुन झाला
शांकंभरी पोर्णिमा दिनी पहाटे चार वाजता चरणतिर्थ होवुन धर्मदर्शनास आरंभ झाला नंतर सकाळी सहा वाजता देविजीस शाकंभरी तील सिंहासन महाअभिषक पुजा करण्यात आल्या नंतर भाविकांचे दही दुध पंचामृतअभिषेक करण्यात आले ते संपल्यानंतर देविजीस वस्ञोलंकार घालण्यात आले नंतर श्रीगणेश ओवरीत दुपारी होमकुंडात कोहळ्याची पुर्णाहुती शांकंभरी यजमान श्री व सौ कुलकर्णी यांच्या हस्ते देण्यात आल्यानंतर शाकंभरी देवि वा आई राजा उदो सदानंदीचा उदो उदो चा गजरात घटोत्यापन करण्यात आले .
शाकंभरी पोर्णिमा निमीत्ताने राञी मंदीर प्रांगणात छबिना काढण्यात आल्यानंतर महंतवाकोजीबुवा यांनी प्रक्षाळपुजा केल्यानंतर महंत तुकोजीबुवा यांनी शांकंभरी नवराञोत्सवातील पोर्णिमेचा जोगवा मागितल्या नंतर शाकंभरी नवराञोत्सवातील धार्मिक विधीचा सांगता झाला.
शनिवारी महाप्रसाद वाटप श्री तुळजाभवानी मातेची नित्योपचार पुजा करण्यात आल्यानंतर देवीला नैवध दाखवुन महाप्रसाद अन्नदान वाटप करण्यात करण्यात आले राञी मंदीर प्रांगणात छबिना काढण्यात आला
















