मध्य रेल्वे, मुंबई विभाग दि. ३.०३.२०२४ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक परिचालीत करणार आहे :
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४९ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांदरम्यान थांबतील आणि नंतर डाऊन मार्गावर वळवण्यात येईल.
घाटकोपर येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकावर थांबतील.
डाऊन धीमी लाइन
ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१८ वाजता सुटेल.
ब्लॉकनंतर पहिली लोकल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सायंकाळी ४.०१ वाजता डोंबिवली करीता सुटणार आहे.
अप धीमी लाईन
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल बदलापूर लोकल असेल जी कल्याण येथून सकाळी ९.१३ वाजता सुटेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल ही ठाणे लोकल असेल जी ठाणे येथून दुपारी ३.३६ वाजता सुटेल.
मानखुर्द ते नेरुळ दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ वाजेपर्यंत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१८ ते दुपारी ३.२८ पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.३७ ते दुपारी ३.४५ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
डाउन हार्बर लाईनवर
ब्लॉकपूर्वी पनवेलसाठी शेवटची ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ वाजता सुटेल.
वाशी करीता शेवटची ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१८ वाजता सुटेल.
ब्लॉकनंतर पनवेलसाठी पहिली लोकल मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी ३.३६ वाजता सुटेल.
अप हार्बर लाईनवर
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी १०.३३ वाजता सुटेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल वाशी येथून दुपारी ४.१९ वाजता सुटेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल येथून सायंकाळी ४.१० वाजता सुटणार आहे.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-मानखुर्द विभागात विशेष उपनगरीय गाड्या चालविण्यात येतील.
हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते दुपारी ४.३० या कालावधीत ट्रान्स हार्बर/मुख्य मार्गांवर प्रवास करण्याची परवानगी असेल.
प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला कृपया सहकार्य करावे.