मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी त्याची लाच घेणाऱ्या अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. दादासाहेब श्रीमंत बोडके, वय ३२ वर्षे, पद पोलीस शिपाई, ब.नं. ११५२, नेमणूक अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण रा. रुम नंबर ४४, जुनी पोलीस लाईन, डी.वाय.एस.पी ऑफीसच्या पाठीमागे, अक्कलकोट, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर असे त्या पोलिसाचे नाव आहे. यातील तक्रारदार हे वापरत असलेला मोबाईल चोरीचा असल्याचे सांगून, तक्रारदार यांचे विरुध्द मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल न करण्याकरिता यातील आलोसे दादासाहेब बोडके यांनी तक्रारदार यांचेकडे ५००० रुपये लाचेची मागणी करून सदरची लाच रक्कम स्वतः स्विकारले वरुन रंगेहात पकडण्यात आले आहे. सदरची कारवाई उमाकांत महाडिक, पोलीस निरीक्षक, एसीबी, सोलापूर. पोलीस अंमलदार- पोहेकों अतुल घाडगे, पोना स्वामीराव जाधव, चापोह राहुल गायकवाड, सर्व नेम. ला.प्र.वि., सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...



















