दिल्लीच्या शास्त्री नगरातील गीता कॉलोनी भागात एका इमारतीच्या पार्किंगला आज, गुरुवारी पहाटे भीषण आग लागली. यात चौघांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
गीता कॉलोनी परिसरातील चार मजली इमारतीच्या पार्किंगमध्ये आज, गुरुवारी पहाटे 5 वाजेच्या सुमाराला आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले.त्यांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले.
या घटनेत इमारतीमधील 9 जण होरपळले. यामध्ये 4 महिला, 3 पुरुष आणि 2 बालकांचा समावेश आहे. या सर्वांना उपचारासाठी स्थानिक हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी आतापर्यंत चौघांचा मृत्यू झालाय. मृतकांमध्ये दोन पुरुष, एक महिला आणि एका बालकाचा समावेश आहे. यासोबतच दिल्लीच्या शहादरा परिसरातही एका घराला भीषण आग लागली. याठिकाणी देखील अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले आहे.




















