जगतातील दिग्गज टेक (तंत्रज्ञान) कंपनी मायक्रोसॉफ्टने कृत्रिम बुद्धीमत्ता (Artificial intelligence) व्यवसायासाठी मुस्तफा सुलेमान यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती केली आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातील मुस्तफा यांनी टेक क्षेत्र गाजवत मोठी झेप घेतली. मुस्तफा सुलेमान यांनी स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन याबाबत माहिती दिली. आता मुस्तफा यांनी टीम मायक्रोसॉफ्टला AI प्रोडक्ट्स तयार करुन देईल. सत्या नडेला यांच्या नेतृत्वात या प्रकल्पाला मुस्तफा नवीन दिशा देतील असे अपेक्षित आहे.
मुस्तफा सुलेमान यांचे वडील सीरियन वंशाचे टॅक्सी चालक होते तर आई ब्रिटनमधील रुग्णालयात परिचारिका होती. अगदी सामान्य पार्श्वभूमीतून आलेले मुस्तफा आज जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या मायक्रोसॉफ्टच्या एआय युनिटचे सीईओ बनले.
Microsoft AI चे नवीन सीईओ

मुस्तफा सुलेमानने २०१० मध्ये अशा काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम करण्यास सुरुवात केली, जेव्हा जगातील बहुतेक लोकांना याची माहितीही नव्हती. मुस्तफाने मित्रासोबत AI स्टार्टअप, AI Lab Deep Mind नावाने कंपनीची सुरुवात केली. Lab Deep Mind मायक्रोसॉफ्टच्या एआयला टक्कर देणारी एक मुख्य कंपन्यांपैकी एक होती ज्याचा सुरुवातीनंतर गुगलने अधिग्रहण केले आणि सुलेमान यांनी गुगलमध्ये AI प्रकल्पावर काम करण्यास सुरुवात केली.