Saturday, May 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

राजकारण: सांगली लोकसभेवरुन काँग्रेसची कोंडी, ठाकरेंकडून परस्पर उमेदवार जाहीर, भाजप हॅटट्रिक करणार?

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
March 23, 2024
in maharashtra
0
राजकारण: सांगली लोकसभेवरुन काँग्रेसची कोंडी, ठाकरेंकडून परस्पर उमेदवार जाहीर, भाजप हॅटट्रिक करणार?
0
SHARES
49
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दिग्गज नेत्यांची मोठी परंपरा असलेला सांगली जिल्हा गेल्या दशकापर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असे. मात्र, गेल्या दोन निवडणुकांमध्ये सलग पराभव झाल्याने ही वीण उसवली. आता भाजपकडून विद्यमान खासदार संजय काका पाटील रिंगणात असून, महाविकास आघाडीत मात्र काँग्रेस आणि शिवसेनेत दोन पाटलांच्या नावांवरून चुरस आहे.

 

सन १९६२ पासून २०१४ पर्यंत काँग्रेसने या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. अगदी आणीबाणीनंतर देशभर काँग्रेसची पडझड झाली, तेव्हाही सांगलीत काँग्रेसचा खासदार निवडून आला होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरही जिल्ह्यात आठपैकी पाच आमदार आणि खासदार काँग्रेसचाच होता; परंतु २०१४ मध्ये मोदी लाटेत हा बालेकिल्ला ढासळला. काँग्रेसचे तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक पाटील यांचा भाजपचे संजय पाटील यांनी मोठ्या फरकाने पराभव केला. २०१९च्या निवडणुकीतही खासदार संजय पाटील यांना ही निवडणूक जड जाईल, असा अंदाज भाजपला वेळीच आला असावा. धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. भाजपने युती सरकार सत्तेवर आल्यास पहिल्या बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याचा शब्द दिला होता.

 

मात्र, पाच वर्षांतही तो पूर्ण न झाल्याने समाज नाराज झाला. याचा अंदाज घेऊन भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी हा मुद्दा घेऊन रान उठवले होते आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ते रिंगणात उतरले. काँग्रेसचे तगडे उमेदवार म्हणून चर्चा सुरू असतानाच विशाल पाटील यांना ऐन वेळी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाची बॅट हातात घ्यावी लागली. नाराज धनगर समाजाची मते विभागली गेल्याने तिरंगी लढतीत संजय पाटील यांचा विजय झाला. या निवडणुकीत विजयी उमेदवार संजय पाटील यांना ५,०८९९५ मते मिळाली. विशाल पाटील यांना ३,४४६४३ तर गोपीचंद पडळकर यांना ३,००२३४ मते मिळाली. गेल्या निवडणुकीत एकूण ६५ टक्के मतदान झाले होते. त्यापैकी संजय पाटील यांना ४३.०१, विशाल पाटील यांना २९.१२ तर पडळकर यांना २५.३७ टक्के मते मिळाली होती. यंदा संजय पाटील तिसऱ्यांदा रिंगणात उतरले आहेत. दहा वर्षाच्या काळात गावागावांत आपला गट केला असला, तरी स्वपक्षातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांचा विरोध असल्याचे दिसून येत आहे.

 

आघाडीत रस्सीखेच

यंदा काँग्रेसकडून विशाल पाटील रिंगणात येणार, अशी खात्री काँग्रेसजन देत होते. मात्र, दुहेरी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांची उमेदवारीही उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. मात्र, काँग्रेस या जागेबाबत प्रचंड आग्रही असून कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसच लढणार, अशी एकमुखी भूमिका सर्वच नेत्यांनी घेतल्याने आघाडीत पेच निर्माण झाला आहे. मात्र, लोकसभेत विजय मिळाल्यास जिल्ह्यात काँग्रेसला उभारी मिळेल, अशी आशा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आहे. शेजारील कोल्हापूरची जागा काँग्रेसला गेल्यानंतर शिवसेनेने सांगलीचा आग्रह धरल्याचे सांगण्यात येते.

 

साखर कारखान्यांचे मोठे जाळे असलेल्या सांगली जिल्ह्यात प्राक्षे, बेदाणा आणि हळद ही मुख्य पिके आहेत. दुसराकडे जिल्ह्यातील मोठा भाग कोरडवाहू असल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीचीही समस्या आहे. ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ अशा कृष्णा नदीतून पाणी उपसा करून दुष्काळी भागाला देणाऱ्या योजनांपैकी काही योजनाचे काम बाकी आहे. सध्या सुमारे दोन लाख नागरिकांना टँकरद्वारे पिण्याचे पाणी द्यावे लागत आहे. सांगलीला विमानतळ नाही. ड्रायपोर्टची चर्चा झाली होती, पण पुढे हा प्रकल्प रद्द झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

 

सांगली, मिरज, पलूस-कडेगाव, तासगाव-कवठे महांकाळ, खानापूर आणि जत आदी विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात आहेत. यापैकी दोन आमदार भाजपचे, दोन काँग्रेसचे, एक राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि एक शिवसेनेच्या शिंदे गटाचा आहे. सांगलीत एकूण १८,३८,८०३ मतदार आहेत.

 

२०१९मधील निवडणुकीतील चित्र

 

– संजय पाटील – भाजप – ५,०८९९५

 

– विशाल पाटील – स्वाभिमानी शेतकरी संघटना – ३,४४६४३

– गोपीचंद पडळकर – वंचित बहुजन आघाडी – ३,००, २३४

Post Views: 75
Previous Post

मायक्रोसॉफ्ट सीईओपदी नवीन चेहरा; जबाबदारी पडली तर शिक्षण सोडले, टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ‘गगन भरारी’

Next Post

कांद्यावरील निर्यात बंदीमुळे शेतकरी संतप्त

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
कांद्यावरील निर्यात बंदीमुळे शेतकरी संतप्त

कांद्यावरील निर्यात बंदीमुळे शेतकरी संतप्त

ताज्या बातम्या

आरोपीला घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनचा अपघात #solapurnews #marathinews #viral

May 30, 2026

रेल्वेच्या वेळापत्रकात होणार बदल #solapurnews #news

May 30, 2026

नालेसफाई महागात नगरअभियंताची वेतनवाढ रोखली झोन अधिकारी निलंबित #solapurnews #viral

May 30, 2026

जरांगे पाटलांच्या उपोषणावर बोलले मुख्यमंत्री #marathinews #news

May 30, 2026

परत हुतात्मा एक्सप्रेस सहा तास पुण्यातच स्टेशनवर रखडली प्रवाशांची गैरसोय #solapurnews #news

May 30, 2026

*सावधान विचलित करणारे दृष्य *जुन्या वादातून सहा जणांचा खून

May 30, 2026

पुण्यात जनगणना करताना शिपाई महिलेला बेदम मारहाण #viral #news #marathinews

May 30, 2026
“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

May 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0886547

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697