Thursday, October 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भाजपकडून मुंबई उत्तर मध्यसाठी उज्ज्वल निकम यांना उमेदवारी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
April 27, 2024
in india
0
भाजपकडून मुंबई उत्तर मध्यसाठी उज्ज्वल निकम यांना उमेदवारी
0
SHARES
29
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातील भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांचे तिकीट कापले असून त्यांच्या जागी भाजपने प्रख्यात वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. उत्तर मध्य मुंबईच्या जागेसाठी उज्ज्वल निकम आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, माधुरी दीक्षितने निवडणूक लढण्यास नकार दिला. त्यानंतर आता उज्ज्वल निकम यांना मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून भाजपनं उमेदवारी जाहिर केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज, शनिवारी भाजपच्या केंद्रीय कार्यालयाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी १५ वी यादी जारी केली. त्यात उज्ज्वल निकम यांचे नाव आहे.

महाविकास आघाडीकडून उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्यात आला. त्यानंतर या मतदारसंघातून नुकतीच मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात आता महायुतीचे उज्ज्वल निकम यांच्या विरोधात मविआच्या वर्षा गायकवाड यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे.

कोण आहेत उज्ज्वल निकम

२६/११ मुंबई हल्ल्यामध्ये उज्ज्वल निकम यांनी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिलं होतं. यामधील एकमेव जिवंत हाती आलेला दहशतवादी अजमल कसाबला फाशीपर्यंत पोहोचवण्यात त्यांची मोठी भूमिका होती. निकम यांनी त्याआधी अनेक महत्वाच्या खटल्यांमध्ये सरकारी वकील म्हणून काम केलं आहे. त्यामुळं महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला ते चांगले परिचित आहेत. देशातील एक निष्णांत वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची ख्याती आहे.

मागील तीन दशकांहून अधिक काळ ते वकिली क्षेत्रात कार्यरत आहेत. निकम हे बीएससी आणि एलएलबी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. निकम यांनी आपल्या कारकिर्दीत २६/११ मुंबई हल्ला खटल्याव्यतिरिक्त १९९१ कल्याण रेल्वे बाॅम्बस्फोट खटला, १९९३ मुंबई साखळी बाॅम्बस्फोट खटला, २००३ गेट वे आॅफ इंडिया आणि झवेरी बाजार बाॅम्बस्फोट खटला आदी महत्वपूर्ण खटले लढले आहेत.

२०१६ मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. २०११ मध्ये त्यांना तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते पुणे विद्यापीठाची मानद डाॅक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे.

पूनम महाजन यांच्यासह मुंबईतील तीन खासदारांचा पत्ता कट

पूनम महाजन यांच्यासह भाजपनं मुंबईतील तीन विद्यमान खासदारांचा पत्ता कट केला आहे. भाजपनं मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून पूनम महाजन यांचं तिकीट कापत उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. याआधीही भाजपनं मुंबईतील दोन विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं आहे. भाजपने उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी आणि ईशान्य मुंबईतील खासदार मनोज कोटक यांचं तिकीट आधीच कापलं आहे.

Post Views: 82
Previous Post

शिवसेनेने काॅंग्रेससोबत जाऊन स्वतःचे हिंदुत्व गमावले – पंतप्रधान

Next Post

मुद्द्याचंच बोलतोय ऐकून घ्या आणि 7 तारखेला कमळाच बटन दाबून या! काँग्रेसच्या रॅप साँगला भाजपचे उत्तर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मुद्द्याचंच बोलतोय ऐकून घ्या आणि 7 तारखेला कमळाच बटन दाबून या! काँग्रेसच्या रॅप साँगला भाजपचे उत्तर

मुद्द्याचंच बोलतोय ऐकून घ्या आणि 7 तारखेला कमळाच बटन दाबून या! काँग्रेसच्या रॅप साँगला भाजपचे उत्तर

ताज्या बातम्या

निम्बर्गी येथे शासनाचे सर्व दाखले एकाच छताखाली

निम्बर्गी येथे शासनाचे सर्व दाखले एकाच छताखाली

October 15, 2026
श्री स्वामी समर्थ मंदिर बळेवाडी येथे ‘नवदुर्गा’ सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न! 

श्री स्वामी समर्थ मंदिर बळेवाडी येथे ‘नवदुर्गा’ सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न! 

October 15, 2026
मातृशक्तीचा गौरव म्हणजे आदिशक्तीचा सन्मान- काशी जगद्गुरु

मातृशक्तीचा गौरव म्हणजे आदिशक्तीचा सन्मान- काशी जगद्गुरु

October 15, 2026
स्पर्धा परीक्षार्थींसाठी हक्काचे अभ्यासकेंद्र; सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील वाचनालयाचे उद्घाटन

स्पर्धा परीक्षार्थींसाठी हक्काचे अभ्यासकेंद्र; सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील वाचनालयाचे उद्घाटन

October 15, 2026

मंदिर समितीच्या गोशाळेतील पशुखाद्यासाठी एक लाख रुपयांची देणगी

October 15, 2026
आयसीआयसीआय बँकेकडून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास सीएसआर निधीतून १० हजार पिशव्यांची मोफत भेट

आयसीआयसीआय बँकेकडून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास सीएसआर निधीतून १० हजार पिशव्यांची मोफत भेट

October 15, 2026
पं. भुवनेश कोमकली यांच्या सुरेल स्वरांनी विठुरायाच्या चरणी स्वरांचा भक्तिजागर!

पं. भुवनेश कोमकली यांच्या सुरेल स्वरांनी विठुरायाच्या चरणी स्वरांचा भक्तिजागर!

October 15, 2026
चिरायू हॉस्पिटल व आयुष्मान भारत योजनेचा भव्य उद्घाटन

चिरायू हॉस्पिटल व आयुष्मान भारत योजनेचा भव्य उद्घाटन

October 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1362744

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!